SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांच्या 169 जागांसाठी भरती

By Admin

Published on:

Follow Us
SBI SO Bharti 2024

SBI SO Bharti 2024: Apply for 169 Assistant Manager Posts at sbi.co.in

SBI SO Recruitment 2024: The State Bank of India (SBI) has invited applications for Specialist Cadre Officer (SCO) posts. Eligible candidates can apply online through SBI’s official website at sbi.co.in. This recruitment drive aims to fill a total of 169 vacancies for Assistant Manager (Engineer) in various streams. Interested candidates must submit their applications online by 12th December 2024. This article provides detailed information about the SBI SO Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, SBI मध्ये एकूण 169 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती (SBI SO Bharti) 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: State Bank of India
  • जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/18
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 169 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)42+1
2असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)25
3असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)101
 एकूण रिक्त पदांची संख्या169

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)(i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)(i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
3असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)(i) B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

  • 21 ते 40 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/EWS/OBC: रु.750/-
  • SC/ST/PWD: फी नाही

वेतन श्रेणी: रु.48,480/- ते रु.85,920/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख22 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख12 डिसेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 – निवड प्रक्रिया:

  • सर्व पदांसाठी: ऑनलाइन लेखी परीक्षा आणि परस्परसंवाद.
  • सहाय्यक व्यवस्थापक (इंजिनियर-फायर): शॉर्टलिस्टिंग आणि परस्परसंवाद.

ऑनलाइन लेखी परीक्षा साधारणतः जानेवारी 2025 मध्ये घेतली जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र बँकेच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाईल आणि उमेदवारांना एसएमएस व ई-मेलद्वारे कळवले जाईल.

परीक्षेमध्ये दोन पेपर असतील: सामान्य योग्यता आणि व्यावसायिक ज्ञान.

  • सामान्य योग्यता चाचणी 90 मिनिटांची असेल.
  • व्यावसायिक ज्ञान चाचणी 45 मिनिटांची असेल.

अंतिम गुणवत्ता यादी व्यावसायिक ज्ञान परीक्षेतील गुण (100 गुणांपैकी) आणि मुलाखतीतील गुण (25 गुणांपैकी) एकत्रित करून तयार केली जाईल. यासाठी 70:30 असे गुणांचे वेटेज ठेवले जाईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघा.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

1) होम पेजवर Careers या विभागावर क्लिक करा आणि तिथून Current Openings पर्याय निवडा.

2) भरतीसाठी दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.

3) Click here for New Registration या पर्यायावर क्लिक करा. आता तुमची माहिती काळजीपूर्वक भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

4) नोंदणी झाल्यानंतर, तुमचे इतर तपशील भरा. तुमचे छायाचित्र आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

5) अर्ज शुल्क ऑनलाइन भरून प्रक्रिया पूर्ण करा.

6) अर्ज सादर केल्यानंतर, पूर्ण भरलेल्या अर्जाचा प्रिंटआउट काढा आणि सुरक्षित ठेवा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment