Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरु!

By Admin

Published on:

Follow Us
Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024: Apply Online for 1500 Local Bank Officer Posts

Union Bank of India Recruitment 2024: Union Bank of India (UBI) has released the Local Bank Officer (LBO) Recruitment 2024 Notification to fill 1,500 posts. The online application process will begin on October 24, 2024, via the official website at unionbankofindia.co.in, and candidates can apply until November 13, 2024. Aspiring candidates can find all the necessary details about the Union Bank LBO Recruitment 2024 below. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे! यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank) मध्ये आता भरपूर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अलीकडेच बँकेने तब्बल 1500 लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 ऑक्टोबरपासून बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia.co.in वर सुरू होत आहे, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

भरती प्रक्रियेतून स्थानिक बँक अधिकारी (LBO) साठी 1500 रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या 1500 पदांची विभागणी देशातील विविध राज्यांमध्ये करण्यात आली आहे, यामध्ये सर्वसाधारण (जनरल) प्रवर्गासाठी सर्वाधिक 613 पदे राखीव आहेत. तसेच अनुसूचित जातीसाठी (SC) 224 पदे, अनुसूचित जमातीसाठी (ST) 109 पदे, OBC साठी 404 पदे, आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) 150 पदे राखीव आहेत.

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Union Bank of India
  • जाहिरात क्र.:
  • पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी
  • पदांची संख्या: 1500 जागा (महाराष्ट्र – 50 जागा)

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1 स्थानिक बँक अधिकारी (LBO) 1500
 एकूण रिक्त पदांची संख्या 1500

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

  • 20 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.850/-
  • SC/ST/PWD: रु.175/-

वेतन श्रेणी: रु. 48,480/- (याव्यतिरिक्त, उमेदवारांना विशेष भत्ता आणि इतर सुविधांचा लाभ देखील मिळेल.)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख24 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

1) सर्वप्रथम Union Bank च्या वेबसाइटवर जा आणि ‘Recruitments’ पृष्ठावर क्लिक करा. तिथे ‘Recruitment of Local Bank Officer (2025-26)’ लिंक शोधा.

2) नवीन नोंदणीसाठी “Click here for New Registration” निवडा. आपले नाव, संपर्क तपशील, आणि ई-मेल भरा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल; हे लक्षात ठेवा.

3) अर्ज भरण्यासाठी “SAVE AND NEXT” पर्याय वापरून आपल्या माहितीची तपासणी करा. (नोंदणी पूर्ण केल्यावर बदल करता येणार नाहीत.)

4) अर्जात सर्व तपशील बरोबर भरले आहेत का ते तपासा.

5) आवश्यकतेनुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

6) ‘Preview’ टॅबवर क्लिक करून संपूर्ण अर्जाचे पुनरावलोकन करा.

7) सर्व तपशील योग्य असल्यास ‘Payment’ टॅबवर क्लिक करून भरणा करा.

8) सर्व माहिती तपासल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment