Maharashtra SSC & HSC Board Exam Time Table 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे. या वेळापत्रकाच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे प्रभावी नियोजन करता येईल. विद्यार्थी खालील लिंक चा वापर करून वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2025 वेळापत्रक
- इयत्ता 12वी (HSC) परीक्षा: 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 या कालावधीत होणार.
- इयत्ता 10वी (SSC) परीक्षा: 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊन 17 मार्च 2025 पर्यंत चालणार.