Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

By Admin

Updated on:

Follow Us
Samaj Kalyan Vibhag Bharti

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: Apply Online for 219 Vacancies

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 (SJSA Recruitment): The Social Justice & Special Assistance Department, Maharashtra (SJSA) has released the official notification for the recruitment of 219 vacancies for the positions of Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, and Warden. Eligible and interested candidates can apply online through the official website at sjsa.maharashtra.gov.in. The last date to submit applications is November 30, 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

Update : मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे! जे उमेदवार काही कारणास्तव अर्ज करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांच्या जागा भरायच्या आहेत. यासाठी अधिसूचना समाज कल्याण विभाग, पुणे या संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. यामध्ये 219 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sjsa.mahararashtra.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 30 नोव्हेंबर 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: The Social Justice & Special Assistance Department, Maharashtra (SJSA)
  • जाहिरात क्र.: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 219 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
 1 उच्चश्रेणी लघुलेखक 10
2गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)61
3गृहपाल/अधीक्षक (महिला)92
4समाज कल्याण निरीक्षक39
5वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
6निम्नश्रेणी लघुलेखक03
7लघुटंकलेखक09
 एकूण रिक्त पदांची संख्या 219

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 उच्चश्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
2गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
3गृहपाल/अधीक्षक (महिला)
4समाज कल्याण निरीक्षक
5वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
6निम्नश्रेणी लघुलेखक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
7लघुटंकलेखक(i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

  • या नोकरीसाठी 18 ते 38 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-
  • मागास प्रवर्ग: रु.900/-

वेतन श्रेणी: नियमानुसार

नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

समाज कल्याण विभाग भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

उमेदवार Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज समाज न्याय आणि विशेष सहाय्यता विभागाच्या (SJSA) अधिकृत वेबसाइटवरून करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या: sjsa.maharashtra.gov.in किंवा वरील Apply Online लिंक वर क्लिक करा.

2) SJSA जाहीरातीसाठी Apply Online बटणावर क्लिक करा.

3) आवश्यक तपशील भरून तुमचा नोंदणी क्रमांक मिळवा.

4) नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

5) सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज फॉर्म पूर्ण करा.

6) अर्ज सादर केल्यावर तुमच्यासाठी एक युनिक क्रमांक तयार होईल.

7) अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील गरजेसाठी प्रिंट काढा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment