PGCIL Bharti 2024: Apply Online for 802 Posts
PGCIL Recruitment 2024: Power Grid Corporation of India Limited (PGCIL) has released a recruitment (POWERGRID Bharti 2024) notification for the posts of Diploma Trainee (Electrical) – DTE, Diploma Trainee (Civil) – DTC, Junior Officer Trainee (HR) – JOT (HR), Junior Officer Trainee (F&A) – JOT (F&A), and Assistant Trainee (F&A) – Asst. Tr. (F&A). Interested candidates can check their eligibility and apply on the PGCIL website at powergrid.in. The last date to submit applications is November 19, 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असेल आणि सरकारी नोकरीची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये तब्बल 802 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल), ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (एचआर/एफए), आणि असिस्टंट ट्रेनिंग (एफए) या पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट powergrid.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Power Grid Corporation of India Limited
- जाहिरात क्र.: CC/10/2024
- पदाचे नाव: विविध
- पदांची संख्या: 802 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 600 |
2 | डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 66 |
3 | ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 79 |
4 | ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | 35 |
5 | असिस्टंट ट्रेनी (F&A) | 22 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 802 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | डिप्लोमा ट्रेनी (Electrical) | 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) |
2 | डिप्लोमा ट्रेनी (Civil) | 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
3 | ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) | 60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS |
4 | ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) | Inter CA/Inter CMA |
5 | असिस्टंट ट्रेनी (F&A) | 60% गुणांसह बी.कॉम. |
वयोमर्यादा:
- 18 ते 27 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: रु.300/-
- पद क्र.5: General/OBC/EWS: रु.200/-
- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
वेतन श्रेणी: रु.85,000/- ते रु.1,17,500/- प्रति महिना.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 22 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 – निवड प्रक्रिया:
1) संगणक आधारित परीक्षा (CBT): पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया 100% गुणांच्या संगणक आधारित परीक्षेवर (CBT) आधारित असेल. यामध्ये दोन भाग असतील:
- भाग-I: तांत्रिक ज्ञान (Technical Knowledge) – तुमच्या शाखेशी संबंधित प्रश्न.
- भाग-II: योग्यता चाचणी (Aptitude Test) – इंग्रजी शब्दसंग्रह, गणिती कौशल्य, विचारक्षमता, सामान्य ज्ञान इत्यादी प्रश्नांचा समावेश असतो.
2) कागदपत्र पडताळणी (Document Verification): लेखी आणि संगणक कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल.
3) वैद्यकीय तपासणी (Pre-Employment Medical Examination): निवड झालेल्या उमेदवारांना POWERGRID च्या वैद्यकीय निकषांनुसार वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:
1) जर तुम्ही पात्र आणि इच्छुक असाल, तर POWERGRID च्या ऑनलाइन नोंदणी प्रणालीद्वारे अर्ज करा. अर्ज करण्यासाठी www.powergrid.in या वेबसाइटवर जा, Careers Section – Job Opportunities – Openings निवडा आणि त्यानंतर ‘Diploma Trainee (Electrical)/ (Civil), Junior Officer Trainee (HR)/ (F&A) आणि Assistant Trainee (F&A) भरती’ या लिंकवर क्लिक करा.
2) मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा.
3) अर्ज करताना एक वैध ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हे अर्ज प्रक्रियेतील सर्व माहिती मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल, त्यामुळे एकदा अर्ज केल्यानंतर तुमचा ई-मेल आणि मोबाइल क्रमांक एक सक्रिय ठेवा.
4) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (जर लागू असेल) – हे सर्व व्यवस्थित आणि स्पष्ट स्वरूपात अपलोड करा, जेणेकरून प्रक्रियेच्या वेळी कोणताही अडथळा येणार नाही.
5) अर्ज सबमिट करा. तुमचा अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रत प्रिंट करून ठेवा, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी हाच प्रिंटआउट आवश्यक असेल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.