NFL Bharti 2024: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executive पदांसाठी भरती; 336 रिक्त पदे

By Admin

Published on:

Follow Us
NFL Bharti

NFL Bharti 2024: Apply Online for 336 Non-Executive Posts

National Fertilizers Limited (NFL) Recruitment 2024: The National Fertilizer Limited (NFL) has invited online applications from eligible candidates for the recruitment of Non-Executive posts 2024. The recruitment drive aims to fill up a total of 336 posts. Interested and eligible candidates can apply by visiting the official website, careers.nfl.co.in, until November 8, 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड (NFL) ने विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत Non-Executive पदांचा समावेश असून, एकूण 336 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी या भरतीसाठी ऑनलाईन अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे, आणि नोव्हेंबर 8, 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी careers.nfl.co.in किंवा nationalfertilizers.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024 (NFL Bharti) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: National Fertilizers Limited (NFL)
  • जाहिरात क्र.: 05 (NFL)/2024
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 336 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II179
2स्टोअर असिस्टंट ग्रेड II19
3लोको अटेंडंट ग्रेड II05
4नर्स10
5फार्मासिस्ट10
6लॅब टेक्निशियन04
7एक्स-रे टेक्निशियन02
8अकाउंट्स असिस्टंट10
9अटेंडंट ग्रेड II90
10लोको अटेंडंट ग्रेड III04
11OT टेक्निशियन03
एकूण रिक्त पदांची संख्या336

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड IIB.Sc.(PCM) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Mechanical/Instrumentation or Electronics or Instrumentation & Control or Electronics & Instrumentation or Electronics Instrumentation & Control or Industrial Instrumentation or Process Control Instrumentation or Electronics & Electrical or Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication or Electronics and Telecommunication or Electronics & Control Engineering or Instrumentation & Process Control/Electrical/Mechanical)
2स्टोअर असिस्टंट ग्रेड IIविज्ञान/वाणिज्य/कला पदवी
3लोको अटेंडंट ग्रेड IIमेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4नर्स12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
5फार्मासिस्ट(i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm
6लॅब टेक्निशियन(i) 12वी उत्तीर्ण + DMLT किंवा B.Sc (Medical Lab Technology)
7एक्स-रे टेक्निशियन(i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (X-Ray/ Medical radiation Technology/ Radiography (Mecical)/Radiography Techniques/Radiology) किंवा B.Sc (Hons)/ B.Sc [Radiography/ Medical Technology (X-Ray or Radiography)/Medical Technology in Radiography/ Radiography & Imagining Technology/Radiology/ RadioIogy & Imaging Technology/Medical Radiology & Imaging Technology/ Medical Technology (Radio diagnosis & Imaging)/ Radiology & Imaging science technology/MedicaI technology (RadioIogy & Imaging)]
8अकाउंट्स असिस्टंटB.Com
9अटेंडंट ग्रेड II(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI [Fitter/Welder/Auto Electrician/Diesel Mechanic/ Turner/ Machinist/ Instrument Mechanic/Electrician / Electrician (Power Distribution) / Technician (Power Electronic system)]
10लोको अटेंडंट ग्रेड III(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Diesel)
11OT टेक्निशियन(i) 12वी (Physics, Chemistry & Biology) उत्तीर्ण   (ii) डिप्लोमा (Operation Theater Techniques/ Operation Theater and Anaesthesia Technology (DOTAT)/Operation Theater Technology)

वयोमर्यादा:

  • 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.200/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वेतन श्रेणी: रु.23,000 ते रु.56,500

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख10 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024 (NFL Bharti) साठी अर्ज कसा करायचा:

एनएफएलच्या (NFL) भरती 2024 नॉन-एग्जीक्यूटिव्ह पदांसाठी अर्ज करताना, उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, आत्ताचा पासपोर्ट साईज फोटो, तसेच इतर संबंधित कागदपत्रे आधीच व्यवस्थित तयार करून ठेवावीत. उमेदवारांनी NFL भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

1) अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वप्रथम तुम्ही www.nationalfertilizers.com या अधिकृत वेबसाईटवर जा.

2) करिअर विभाग निवडा: वेबसाईटच्या होमपेजवर ‘करिअर’ विभागावर क्लिक करा.

3) रिक्रूटमेंट लिंक शोधा: तिथे तुम्हाला ‘NFL Recruitment’ लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

4) Non-Executive Recruitment 2024 निवडा: ‘Non-Executive Recruitment 2024’ या लिंकवर क्लिक करून पुढे जा.

5) नोंदणी करा: नवीन उमेदवार असाल तर नोंदणी करा आणि त्यानंतर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करा.

6) तपशील भरा: तुमची सर्व आवश्यक माहिती नीट भरून घ्या.

7) फी भरा: अर्जाची फी भरून अर्ज सबमिट करा.

8) प्रिंटआउट काढा: अर्ज सबमिट केल्यानंतर एक प्रिंटआउट काढून ठेवा, जेणेकरून भविष्यातील आवश्यकतेसाठी ते तुमच्याकडे असेल.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment