MSC Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती; पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी!

By Admin

Published on:

Follow Us
MSC Bank Bharti

MSC Bank Bharti 2024: Apply for 75 Junior Officer and Trainee Associate Vacancies

Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2024: The Maharashtra State Cooperative (MSC) Bank has released the official recruitment notification to hire 75 candidates for the positions of Trainee Junior Officers and Trainee Associates. Interested and eligible candidates can apply online through the bank’s website at mscbank.com. The last date to apply is 08 November 2024. Read below for eligibility, the selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदांच्या एकूण 75 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: The Maharashtra State Co-op. Bank Ltd
  • जाहिरात क्र.: 02/MSC Bank/2024-2025
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी
  • पदांची संख्या: 75 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 25
 2प्रशिक्षणार्थी सहयोगी 50
 एकूण रिक्त पदांची संख्या 75

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
 2प्रशिक्षणार्थी सहयोगी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा:

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : 23 ते 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी सहयोगी : 21 ते 28 वर्षे

अर्ज फी:

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : रु.1770/-
  • प्रशिक्षणार्थी सहयोगी : रु.1180/-

वेतन श्रेणी: रु.32,000/ ते रु.49,000/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख19 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख08 नोव्हेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
ऑनलाईन अर्जApply Online

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 – निवड प्रक्रिया:

1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officers) – या पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. परीक्षा 200 गुणाची असून परीक्षा हि फक्त इंग्रजीतच घेतली जाईल. (only exam & personal interview)

2) प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associates) – या पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. ही परीक्षा पूर्व [Prelims] आणि मुख्य [Mains] या दोन टप्प्यात होईल. पूर्व परीक्षा 100 गुणांची तर मुख्य परीक्षा हि 200 गुणांची असणार आहे. परीक्षा माध्यम इंगजी इंग्रजी असेल.


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 – अर्ज कसा करायचा:

उम्मीदवारांच्या सोयीसाठी या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोप्या भाषेत खाली दिली आहे:

1) सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट mscbank.com/careers वर जा. किंवा वरील ‘Apply Online’ बटनावर क्लिक करा.

2) तिथे “Trainee Junior Officers आणि Trainee Associates साठी अर्ज करा” या बटणावर क्लिक करा.

3) आधी रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक माहिती भरा, ज्यामुळे तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.

4) मग त्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.

5) सूचना नीट वाचा आणि त्यानुसार अर्ज भरा.

6) अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक युनिक क्रमांक मिळेल.

7) भविष्यातील संदर्भासाठी अर्ज फॉर्म डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment