FDA Maharashtra Bharti 2024: Apply for 56 Senior Technical Assistant & Analytical Chemist posts
FDA Maharashtra Recruitment 2024: Food & Drugs Administration, Maharashtra has invited applications for Senior Technical Assistant and Analytical Chemist, Group-B posts. Eligible candidates can apply online through the official website of Food & Drugs Administration, Maharashtra at fda.maharashtra.gov.in. This recruitment drive will fill up 56 posts in the organization. The last date to apply is till 22 October 2024. Read below for eligibility, selection process and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com For the Latest Recruitment.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यशाळांमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांमधील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वरिष्ठ तांत्रिक सहायक (Senior Technical Assistant) पदाच्या 37 जागा आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist, Group-B) या पदाच्या 19 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
- संस्थेचे नाव: Food & Drugs Administration, Maharashtra
- जाहिरात क्र.: 01/2024
- पदाचे नाव: वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ
- पदांची संख्या: 56 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
2 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | 19 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 56 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | वरिष्ठ तांत्रिक सहायक | (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी |
2 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव |
वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- राखीव प्रवर्ग: रु.900/-
वेतन श्रेणी: विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदावर निवड झालेल्या उमदेवारांना 38600-122800 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. तर, वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35400-112400 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 23 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑक्टोबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.