BRO Bharti 2024: सीमा रस्ते संघटने मार्फत 466 पदांची भरती; अर्ज कसा करावा?

By Admin

Published on:

Follow Us
BRO Bharti 2024

BRO Bharti 2024: Apply Online for 466 Posts

BRO Recruitment 2024: The Border Roads Organisation (BRO) has released the BRO Notification 2024 PDF for the recruitment of a total of 466 vacancies for the posts of Draughtsman, Supervisor, Turner, Machinist, Operator, and Driver. Interested candidates can check the eligibility criteria and apply on the official website, bro.gov.in. As per the BRO recruitment notification 2024, the application process will start on November 16, 2024, and will remain open until December 30, 2024. This article provides detailed information about the BRO Recruitment process, eligibility criteria, selection procedure, important dates, application steps, and other details.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (Border Roads Organization) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 466 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये ड्राफ्ट्समॅन, सुपरवायझर, टर्नर, मशीनिस्ट आणि ऑपरेटरसह इतर पदांचा समावेश आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

सीमा रस्ते संघटना भरती (BRO Bharti) 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..

  • संस्थेचे नाव: Border Roads Organisation
  • जाहिरात क्र.: 01/2024
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 466 जागा

पदानुसार रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
 1 ड्राफ्ट्समन16
2सुपरवाइजर (Administration)02
3टर्नर10
4मशीनिस्ट01
5ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG)417
6ड्रायव्हर रोड रोलर02
7ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन18
एकूण रिक्त पदांची संख्या466

शैक्षणिक पात्रता:

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी, 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. पदांनुसार आणि पात्रतेशी संबंधित इतर तपशील खालीलप्रमाणे..

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 1 ड्राफ्ट्समन12वी उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा

ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव
2सुपरवाइजर (Administration)(i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य
3टर्नरITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.
4मशीनिस्ट(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)
5ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG)(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
6ड्रायव्हर रोड रोलर(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव
7ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन(i) 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव

वयोमर्यादा:

  • 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS/ExSM: रु.50/- 
  • SC/ST: फी नाही

वेतन श्रेणी: पदानुसार रु.18,000/- ते रु.81,100/- प्रति महिना.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख16 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 डिसेंबर 2024
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटWebsite
जाहिरात (Notification)Download
अर्ज (Application Form)Download
फी भरण्याची लिंक (Payment Link)Click Here

सीमा रस्ते संघटना भरती 2024 – निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, स्क्रिनिंग टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट , कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

1) लिखित परीक्षा: ही भरती प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. हा टप्पा सर्व पदांसाठी समान आहे. उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल.

2) शारीरिक चाचणी/कौशल्य चाचणी/ड्रायव्हिंग चाचणी: लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांनी अर्ज केलेल्या पदांनुसार शारीरिक चाचणी, कौशल्य चाचणी किंवा ड्रायव्हिंग चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

3) कागदपत्र पडताळणी: जे उमेदवार मागील दोन टप्प्यांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसह, जसे की मार्कशीट, ओळखपत्र इत्यादी, कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

4) वैद्यकीय तपासणी: कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवडीसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल.


सीमा रस्ते संघटना भरती 2024 – अर्ज प्रक्रिया:

1) अधिकृत वेबसाइट bro.gov.in ला भेट द्या.

2) होमपेजवर ‘ऑनलाइन अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा.

3) आपले नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

4) नोंदणी झाल्यानंतर तुमच्या डिटेल्ससह लॉगिन करा.

5) अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

6) सर्व तपशील नीट तपासून घेतल्यावर अर्ज सबमिट करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment