Van Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती; 10वी/12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

By Nitin Tonpe

Published on:

Van Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती

Van Vibhag Bharti 2023: Maharashtra Forest Department released a notification for recruitment for various posts. Applications are invited for the post of Forest Guard, Lekhpal / Accountant- Group C, Surveyor, Higher Grade Stenographer- Group B, Lower Grade Stenographer- Group B, Jr. Engineer Civil- Gr. B, Senior Statistical Assistant- Group C, and Junior Statistical Assistant Group C. The application process started on 10 June 2023 and the last date to apply is 30 June 2023. Candidates can apply at mahaforest.gov.in.

महाराष्ट्र वन विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वन विभागाने 2417 जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत, वनरक्षक (गट क), लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जून 2023 असणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची मुदत याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Van Vibhag Bharti 2023 Overview

Name of OrganizationMaharashtra Forest Department
Recruitment NameVan Vibhag Bharti 2023
Post NameForest Guard, Lekhpal / Accountant, Surveyor, Higher Grade Stenographer
Total Vacancy2417
Last Date to Apply30 June 2023
Job LocationMaharashtra
Official websitemahaforest.gov.in

Maharashtra Forest Recruitment 2023: Apply Online for 2417 Vacancies at mahaforest.gov.in

Maha Forest Recruitment 2023 (Van Vibhag Bharti 2023) notification has been released for 2417 Posts. Check the application process, age limit, qualification, selection process, last date, and other details below.

संस्थेचे नाव: महाराष्ट्र वन विभाग

जाहिरात क्र.: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

पदाचे नाव: वनरक्षक, लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

पदांची संख्या: 2417 जागा

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

रिक्त जागा तपशील: Maha Forest Recruitment Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
वनरक्षक (गट क)2138
लेखापाल (गट क)129
सर्वेक्षक (गट क)86
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15

शैक्षणिक पात्रता: Maha Forest Recruitment Education Qualification

खालील सर्व पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान म्हणजेच लिहिणं, वाचणं आणि बोलणं आवश्यक आहे.

वनरक्षक (गट क):

 • उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असावा.
 • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
 • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
 • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

लेखापाल (गट क): मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.

सर्वेक्षक (गट क): 12 वी पास आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब): (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब): (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब): सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी.

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा: Maha Forest Recruitment Age Limit

वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • खुला प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे.
 • मागासवर्गीय/अनाथ: 18 ते 32 वर्षे.

इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • खुला प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे.
 • मागासवर्गीय/अनाथ: 18 ते 45 वर्षे.

अर्ज फी: Maha Forest Recruitment Application Fees

 • खुला प्रवर्ग: ₹1000/- 
 • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
 • माजी सैनिक: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment