SSC GD Constable Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 – 25487 पदांसाठी अर्ज सुरू!

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026
Advertisements

SSC GD Constable Bharti 2026: Apply for 25487 vacancies at ssc.gov.in

SSC GD Constable Recruitment 2026: The Staff Selection Commission (SSC) has released the notification for the Constable (General Duty) in CAPFs, SSF and Rifleman (GD) in Assam Rifles Examination 2026. The online application process has begun on the official website ssc.gov.in, and candidates can apply between 01 December and 31 December 2025. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.

SSC GD Constable Recruitment 2025 Overview

SSC GD Notification 2026
Name of OrganizationStaff Selection Commission
Exam NameConstable (General Duty) in Central Armed Police Forces (CAPFs) and Secretariat Security Force (SSF), and Rifleman (General Duty) in Assam Rifles Examination, 2026.
Post NameConstable (General Duty)
Total Vacancy25487
Application Start Date01 December 2025
Last Date to Apply31 December 2025
Mode of Application      Online
Selection Process• Computer-Based Test (160 Marks)
• PET/PST (Qualifying)
• Document Verification
• Medical Examination
Job LocationAll India
Official Websitessc.gov.in
SSC GD Constable Bharti 2026 (स्टाफ सिलेक्शन कमिशन GD कॉन्स्टेबल भरती 2026)

www.SpardhaPariksha.com

भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25,487 पदे भरली जाणार आहेत.

Advertisements

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (SSC GD Constable Bharti 2026) ते एसएससीच्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 01 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांची निवड कंप्युटर आधारित परीक्षा (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय चाचणी यांच्या आधारे केली जाणार आहे.

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

जाहिरात क्र.:

भरती प्रकार: भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री दलांमध्ये पर्मनंट सरकारी नोकरीची संधी

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: कॉन्स्टेबल

पदांची संख्या: 25487 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)25487
एकूण रिक्त पदांची संख्या25487

फोर्स नुसार जागा (Force-wise Vacancy)

अ. क्र.फोर्सपद संख्या
1सीमा सुरक्षा दल (BSF)616
2केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)14595
3केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)5490
4सशस्त्र सीमा बल (SSB)1764
5भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP)1293
6आसाम रायफल्स (AR)1706
7सचिवालय सुरक्षा दल (SSF)23
एकूण रिक्त पदांची संख्या25487

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

  • 18 ते 23 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.100/- 
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.21,700/- ते रु.69,100/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख01 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025
परीक्षाफेब्रुवारी-एप्रिल 2026

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट (Website)येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements