MPSC Rajyaseva Syllabus 2024 in Marathi PDF Download [Prelims & Mains]

By Admin

Published on:

Follow Us
MPSC Rajyaseva Syllabus

MPSC Rajyaseva Syllabus 2024 in Marathi PDF: राज्यसेवा पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम

MPSC Rajyaseva 2024-2025 Syllabus revised by the Maharashtra Public Service Commission (MPSC). Download the MPSC syllabus PDF for all the subjects. Also, know about the marking scheme and duration for the exam here. In this article, you can read and download the complete MPSC Prelims Syllabus and MPSC Mains Syllabus 2024 in Marathi as well as English in PDF format. Every Year Maharashtra State Government conducts MPSC Recruitment also called as MPSC Rajyaseva Exam to hire candidates for various positions in State Government institutions.

MPSC Rajyaseva Exam Overview 2024

Name of OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Post NameDeputy Collector, Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (Unarmed), Assistant Commissioner of State Taxes, etc.
Total VacancyTo be announced
Last Date to ApplyTo be announced
Prelims Exam DateTo be announced
Mains Exam DateTo be announced
Selection Process•Prelims
•Mains
•Interview
Job LocationMaharashtra, India
Official Websitempsc.gov.in

Candidates must refer to the latest MPSC Rajyaseva Syllabus while preparing for the exam. As per the latest notification, the commission has revised the MPSC Prelims and Mains Syllabus 2024. From this article, you can get the latest MPSC State Service Syllabus (MPSC Rajyaseva Syllabus) and the exam pattern.

MPSC Rajyaseva Question PapersMPSC Combine Exam Syllabus
MPSC Combined Question Papers

MPSC Rajyaseva New Syllabus 2024: राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.  त्यानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून लागू करण्यात येईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात झालेले बदल:

  • आता राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275 गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.
  • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.
  • तसेच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.

MPSC Rajyaseva Exam 2024

MPSC conducts the Maharashtra State Service examination annually on a regular basis for the recruitment of Grade-A & Grade-B officers in the Maharashtra state department for various posts like Deputy Collectors, Deputy Superintendent of Police (DSP), Revenue Officer, etc. The exam is conducted in three stages – Prelims, Mains, and Interviews. Candidates who qualify for the Prelims stage appear for the mains exam. Each exam stage has a different exam pattern and syllabus. For more information on the revised MPSC Exam pattern and detailed syllabus, you can check the link below.

MPSC Rajyaseva Exam Syllabus in Marathi & English

MPSC Rajyaseva syllabus is set by the Maharashtra Public Service Commission (MPSC). The commission conducts a (Rajyaseva) State Service Exam 2024 for the recruitment of officers and employees for various departments of the Maharashtra Government.

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has made significant changes in the examination pattern and syllabus of the State Services Examination. This change will be implemented from State Services Examination 2024 onwards. The format of the revised scheme is 2025 marks consisting of Descriptive Question Papers, Interview, and Written Examinations.

MPSC Rajyaseva syllabus for Prelims has two papers, General Studies, and General Aptitude papers and the Mains syllabus has a total of 9 papers where four are General Studies papers. The MPSC Rajyaseva syllabus (MPSC State Service) is divided into three major sections, Prelims, Mains, and Interview. It is of prime importance for the candidates to be familiar with the MPSC Rajyaseva Prelims and Mains syllabus to qualify for the exam. The candidates can check the revised syllabus for the MPSC Rajyaseva Exam (Prelims and Mains) in this article below.

MPSC Rajyaseva Prelims Exam Pattern 2024
पेपर क्रमांकप्रश्नगुणपरीक्षेचा स्तरभाषापरीक्षेचा कालावधीपरीक्षेचे स्वरूप
पेपर 1100200पदवीमराठी आणि इंग्रजी2 तासबहुपर्यायी
पेपर 280200घटक (1) to (5) पदवी स्तर
घटक (6) दहावी स्तर
घटक (7) दहावी किंवा बारावी स्तर
मराठी आणि इंग्रजी2 तास
टीप – सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 (CSAT) हा अर्हताकारी (Qualifying) असून अर्हताप्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळविणे आवश्यक राहील. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

नकारात्मक गुणदान:- पेपर क्रमांक 9 करीता व पेपर क्रमांक 2 मधील “Decision making & Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.

  1. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
  2. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 250 किंवा 2/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
  3. वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  4. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
MPSC Rajyaseva Prelims Syllabus 2024

पेपर एक (200 गुण)

1राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
2भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.
3महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.
4भारत आणि महाराष्ट्र- राज्यशास्त्र व प्रशासन संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.
5आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.
6पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.
7सामान्य विज्ञान

पेपर दोन (200 गुण)

1आकलन
2संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.
3तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
4निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.
5सर्वसाधारण मानसिक क्षमता
6मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी इयत्ता दहावी स्तरावरील)
7मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी/बारावी स्तरावरील)
  • टीप 1: इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभयासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील. परिच्छेदामार्फत करण्यात येईल.
  • टीप 2: प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
  • टीप 3: मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो/ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.
MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2024
• MPSC मुख्य परीक्षा 2023 मध्ये एकूण 9 पेपर असतील.
• पेपर 1 आणि पेपर 2 किमान 25% गुणांसह पात्र होणे अनिवार्य आहे.
• उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रत्येकी 250 गुणांसह 2 पर्यायी विषय निवडू शकतात.
पेपर क्रमांकविषयगुणपरीक्षेचा स्तरमाध्यमकालावधीअहर्ताकारी/अनिवार्यताप्रश्नपत्रिकेचे स्वरूप
पेपर 1मराठी300दहावीमराठी3 तास25% गुणासह अहर्ताकारीवर्णात्मक/पारंपारिक
पेपर 2इंग्रजी300दहावीइंग्रजी3 तास
गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स
पेपर 3निबंध250पदवीमराठी/इंग्रजी3 तासअनिवार्यतावर्णात्मक/पारंपारिक
पेपर 4सामान्य अध्ययन – 01250पदवीमराठी/इंग्रजी3 तास
पेपर 5सामान्य अध्ययन – 02250पदवीमराठी/इंग्रजी3 तास
पेपर 6सामान्य अध्ययन – 03250पदवीमराठी/इंग्रजी3 तास
पेपर 7सामान्य अध्ययन – 04250पदवीमराठी/इंग्रजी3 तास
पेपर 8वैकल्पिक विषय पेपर क्र. 01250पदवीमराठी/इंग्रजी3 तास
पेपर 9वैकल्पिक विषय पेपर क्र. 02250पदवीमराठी/इंग्रजी3 तास

टीप:

  • पेपर क्रमांक 3 ते 7 साठी, उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी मध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजेच एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील.
  • मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी.
  • वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही.
  • प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. (भाषा प्रश्नपत्रिका, मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून)
MPSC Rajyaseva Mains Syllabus 2024

पेपर – 1 : मराठी भाषेचा अर्हताकारी पेपर (300 गुण)

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.

प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-

  • (एक) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
  • (दोन) संक्षिप्त लेखन
  • (तीन) परिपाठ आणि शब्दसंग्रह
  • (चार) लघु निबंध
  • (पाच) इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद.

हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.

पेपर – 2 : इंग्रजी भाषेचा अर्हताकारी पेपर (300 गुण)

महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्दिष्ट आहे.

प्रश्नांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असेल:-

  • (एक) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन
  • (दोन) संक्षिप्त लेखन
  • (तीन) परिपाठ व शब्द संग्रह
  • (चार) लघु निबंध

हा पेपर अर्हताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत.

पेपर – 3 : निबंध (250 गुण)

उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांचेकडून अपेक्षित आहे.

पेपर – 4 : सामान्य अध्ययन 1 (250 गुण)

भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह

  • भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
  • महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
  • आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
  • स्वातंत्र्यलढा- स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
  • स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
  • भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता.
  • महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
  • जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
  • सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे.
  • जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह) जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह).
  • भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.

पेपर 5 : सामान्य अध्ययन 2 (250 गुण)

प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह

  • भारतीय संविधान- ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
  • संघ व राज्ये यांची कार्ये व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने.
  • विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था.
  • भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना.
  • संसद व राज्य विधानमंडळे- संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्ये, सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक/अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका.
  • स्थानिक स्वराज्य संस्था.
  • लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्टे.
  • विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या.
  • वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे.
  • विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
  • विकास प्रक्रिया व विकास उद्योग अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका.
  • समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र / सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न.
  • दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
  • प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासन:- उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलू नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
  • नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
  • भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे
  • विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.

पेपर – 6 : सामान्य अध्ययन 3 (250 गुण)

तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह

  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनशी संबंधीत मुद्ये, साधनसंपतीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार.
  • सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या.
  • सरकारी अर्थसंकल्प.
  • देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी संबंधित मुद्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली – उद्दिष्टये, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा; शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारणा.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधाः ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी.
  • गुंतवणूक प्रतिमाने.
  • विज्ञान व तंत्रज्ञान- घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम.
  • विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धि मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या.
  • संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, लवचिक समाज.
  • विकास आणि वादाचा प्रसार यांच्यामधील दुवे.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका.
  • संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईटस्ची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाक्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध.
  • विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश.

पेपर 7 : सामान्य अध्ययन 4 (250 गुण)

नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता.

या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.

अभ्यासक्रम:

  • नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखताः मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
  • अभिवृत्तीः घटक, संरचना, कार्य; त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध. नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा.
  • नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, नि:पक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
  • भावनिक बुध्दांक- संकल्पना आणि त्याची उपयोगीता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • लोक प्रशासनातील सार्वजनिक / नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकताः स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधी नैतिक चिंता आणि कोंडी; नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम, विनियम व सदसदविवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन; शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण; आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या; निगम प्रशासन.
  • प्रशासनातील सभ्यता: लोकसेवेची संकल्पना; प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील समस्यांवरील घटना अभ्यास.

पेपर – 8 : वैकल्पिक विषय पेपर 1 (250 गुण) आणि पेपर – 9 : वैकल्पिक विषय पेपर 2 (250 गुण)

वैकल्पिक विषयांच्या यादीमधील कोणताही वैकल्पिक विषय निवडता येईल.

वैकल्पिक विषयांची यादी

1कृषी
2पशुसंवर्धन व पशुविज्ञान
3मानवशास्त्र
4जीवशास्त्र
5रसायनशास्त्र
6स्थापत्य अभियांत्रिकी
7वाणिज्य व लेखाशास्त्र
8अर्थशास्त्र
9विद्युत अभियांत्रिकी
10भूगोल
11भूशास्त्र
12इतिहास
13विधि
14व्यवस्थापन
15मराठी साहित्य
16गणित
17यांत्रिकी अभियांत्रिकी
18वैद्यक शास्त्र
19तत्त्वज्ञान
20भौतिकशास्त्र
21राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध
22मानसशास्त्र
23लोकप्रशासन
24समाजशास्त्र
25सांख्यिकी
26प्राणी शास्त्र

MPSC Syllabus 2024 in Marathi PDF Download

The candidates can know and download the detailed New MPSC Syllabus 2024 in Marathi and English from the official syllabus PDF given below. we have provided an updated MPSC Rajyaseva syllabus for prelims and mains. This Revised MPSC Rajyaseva Syllabus will be applicable from MPSC Rajyaseva 2024 Examination onwards.

MPSC Rajyaseva Syllabus 2024 PDF (Marathi)Download
MPSC Rajyaseva Syllabus 2024 PDF (English)Download

Now you are provided with all the necessary information regarding MPSC Rajyaseva Syllabus. We hope this detailed article helps you.

FAQ

How many stages are there for the MPSC Exam?

MPSC state services exam is conducted in three stages: Prelims. Mains. Interview.

How many papers are there for the MPSC Mains Exam?

There are 9 papers for the MPSC Mains Exam.

What is the medium of the MPSC Rajyaseva Exam 2024?

The MPSC Exam is conducted in both English & Marathi. Thus, you must select the language as per your choice for the MPSC exam in Prelims or Mains exam scheduled in the year 2024.

Leave a Comment