MPSC Group-B Recruitment 2025: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has invited online applications for various Group-B (Non-Gazetted) posts, including Assistant Section Officer (ASO) and State Tax Inspector (STI). This recruitment drive will fill 282 vacancies across multiple government departments in Maharashtra. Eligible candidates can apply online at mpsc.gov.in. The last date to apply is August 21, 2025, and the preliminary examination will be conducted on November 9, 2025. Read below for eligibility criteria, selection process, salary details, and how to apply.
MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-ब’ भरती 2025 – 282 जागा www.SpardhaPariksha.com |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2025 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, एकूण 282 रिक्त पदांवर भरती होणार आहे. या भरतीमध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे. यासाठीची पूर्व परीक्षा 09 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभरातील 37 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये स्थायी व प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
जाहिरात क्र.: 117/2025
भरती प्रकार: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब पदांसाठी पर्मनंट नौकरीची संधी
भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन
पदाचे नाव: सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक
पदांची संख्या: 282 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सहायक कक्ष अधिकारी (ASO) | 03 |
2 | राज्य कर निरीक्षक (STI) | 279 |
एकूण रिक्त पदांची संख्या |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य
वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: रु.294/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.44,900/- ते रु.1,42,400/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 01 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | 09 नोव्हेंबर 2025 |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.