MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी; 290 जागांसाठी भरती सुरू!

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती
Advertisements

MJP Bharti 2025: Notification Out for 290 Vacancies

MJP Recruitment 2025: The Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) has released the official recruitment notification for various posts includingAudit Officer/Senior Accounts Officer (Group-A), Accounts Officer (Group-B), Junior Engineer, Junior Clerk/Clerk-N-Typist, and other posts. The recruitment drive aims to fill a total of 290 vacancies. The online application process started on 20th November 2025, and eligible candidates can apply through the official website www.mjp.maharashtra.gov.in. The last date to submit the application form is 26th December 2025. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.

Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) Recruitment 2025 Overview

Maharashtra Jeevan Pradhikaran Notification 2025
Name of OrganizationMaharashtra Jeevan Pradhikaran
Exam NameMJP Recruitment 2025
Post NameVarious Posts
Total Vacancy290
Application Start Date20th November 2025
Last Date to Apply19th December 2025 26th December 2025
Mode of Application      Online
Selection Process• Computer Based Online Examination
Job LocationAll Maharashtra
Official Websitemjp.maharashtra.gov.in
(MJP Bharti 2025) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

www.SpardhaPariksha.com

राज्यातील तरुणांसाठी एक मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत एकूण 290 पदांची भरती जाहीर करण्यात आली असून ही भरती प्रक्रिया IBPS मार्फत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mjp.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सर्वाधिक 144 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), लिपिक तसेच इतर तांत्रिक व प्रशासकीय पदांवरही भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2025 आहे.

Advertisements

Note: या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

जाहिरात क्र.: एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३

भरती प्रकार: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात पर्मनंट सरकारी नोकरीची संधी

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन

पदाचे नाव: विविध पदे

पदांची संख्या: 290 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)02
2लेखा अधिकारी (गट-ब)03
3सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)06
4उपलेखापाल (गट-क)03
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  (गट-ब)144
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)16
7उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)03
8  निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)06
9कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क)46
10सहाय्यक भांडारपाल (गट-क)13
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)48
एकूण रिक्त पदांची संख्या290

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ)(I) B.Com किंवा समतुल्य (II) 10 वर्षे अनुभव
2लेखा अधिकारी (गट-ब)(I) M.Com किंवा समतुल्य (II) 05 वर्षे अनुभव
3सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब)B.Com
4उपलेखापाल (गट-क)B.Com
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  (गट-ब)सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब)मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
7उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब)(I) 10वी उत्तीर्ण (II) लघुलेखन 120 श.प्र.मि. (III) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
8  निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब)(I) 10वी उत्तीर्ण (II) लघुलेखन 100 श.प्र.मि. (III) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.
9कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क)(I) पदवीधर (II) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
10सहाय्यक भांडारपाल (गट-क)(I) 10वी उत्तीर्ण (II) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)(I) 10वी उत्तीर्ण (II) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

वयोमर्यादा:

  • लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ): 45 वर्षांपर्यंत
  • इतर पदांसाठी: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: रु.900/-

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.56,100/- ते रु.1,77,500/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख20 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 डिसेंबर 2025 26 डिसेंबर 2025
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट (Website)येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक (Corrigendum)येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements