Marathi Current Affairs – 9 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 9 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 9 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 9 फेब्रुवारी 2024

1) दरवर्षी कोणत्या कालावधीत वन ‘अग्नी सूरुक्षा सप्ताह साजरा’ करण्यात येतो?

उत्तर : 1 ते 7 फेब्रुवारी

2) नवी दिल्ली येथे ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे’ उद्घाटन कोणी केले?

उत्तर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

3) ‘जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024’ राज्यसभेत कोणी मांडले आहे?

उत्तर : भूपेंद्र यादव

4) भारतातील पहिला स्वदेशी बनावटीचा 150 मिमीचा स्मार्ट दारूगोळा (155mm Smart Ammunition) कोणत्या संस्थेने विकसित केला आहे?

उत्तर : आयआयटी मद्रास

5) अलीकडेच, बातम्यांमध्ये पाहिलेले सिपाहीजाला वन्य अभयारण्य (Sepahijala Wildlife Sanctuary) कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : त्रिपुरा

6) RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दर अपरिवर्तित किती टक्के ठेवला आहे?

उत्तर : 6.5%

7) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये प्रथम स्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे?

उत्तर : जसप्रीत बुमराह

8) 7वी ‘इंडियन ओशन कॉन्फरन्स’ कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?

उत्तर : ऑस्ट्रेलिया

9) केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिपची कोणती आवृत्ती सुरू केली?

उत्तर : पहिली

10) नवी दिल्ली येथे झालेल्या 17 व्या भारतीय नौदल (IN) – फ्रेंच नौदल (FN) स्टाफ बैठकीदरम्यानच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता?

उत्तर : ऑपरेशनल रणनीती, प्रशिक्षण सराव, SME देवाणघेवाण


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment