Marathi Current Affairs – 8 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 8 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 8 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 8 फेब्रुवारी 2024

1) दरवर्षी ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ (Safer Internet Day) केव्हा साजरा केला जातो.

उत्तर : 6 फेब्रुवारी 2024 (फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी)

2) भारतीय निवडणूक आयोगाने नुकतेच अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नाव आणि चिन्ह मंजूर केले आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह कोणते?

उत्तर : घड्याळ

3) ‘दिव्य कला मेळा’ 2024 कुठे आयोजित केला जात आहे?

उत्तर : आगरतळा (त्रिपुरा)

4) भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : मियो ओका (Mio Oka)

5) नुकतीच, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर : न्यायमूर्ति विजय बिश्नोई

6) कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवासाची घोषणा केली आहे?

उत्तर : इराण

7) सध्या चर्चेत असलेला ‘व्योममित्र’ हा इस्रो च्या कोणत्या मिशन शी संबधित आहे?

उत्तर : गगणयान

8) नुकतेच, दक्षिण पूर्व रेल्वेने (South Eastern Railway) पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे?

उत्तर : टाटा स्टील

9) RBI ने 6 बँकांमधील 9.5% पर्यंत कोणत्या बँक गटाचे अधिग्रहण करण्यास मान्यता दिली.

उत्तर : एचडीएफसी बँक (HDFC Bank)

10) ताज्या अहवालानुसार, कोणी आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) साठी भारताचा विकास दृष्टिकोन 6.2% वर सुधारित केला आहे?

उत्तर : आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (OECD)


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment