Marathi Current Affairs – 7 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 7 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 7 फेब्रुवारी 2024

1) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेला’ मान्यता दिली आहे?

उत्तर : महाराष्ट्र

2) भारत ऊर्जा सप्ताह 2024 (India Energy Week 2024) कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे?

उत्तर : गोवा

3) भारताच्या पहिल्या ‘डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची’ पायाभरणी कोठे करण्यात आली?

उत्तर : हैदराबाद

4) कोणत्या भारतीय संगीत बँड ला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे?

उत्तर : शक्ती (अल्बम – ‘दिस मोमेंट’)

5) राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?

उत्तर : जुन्नर

6) राष्ट्रीय बाल भवन, नवी दिल्ली येथे दोन दिवसीय ‘उल्लास मेळा’चे उद्घाटन कोणी केले?

उत्तर : धर्मेंद्र प्रधान (भारताचे शिक्षण मंत्री)

7) 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत?

उत्तर : पॅरिस

8) ‘आऊटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर – 2023’ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : डॉ.बिना मोदी

9) 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत अवकाशात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे?

उत्तर : व्योमित्र

10) राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 87 किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये कोणी विजेतेपद पटकावले?

उत्तर : सुनील कुमार


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment