Marathi Current Affairs – 5 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 5 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 5 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 5 फेब्रुवारी 2024

1) भारतीय नौदलाने 2024 ला कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : Year of Naval Civilians

2) नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले ‘INS संध्याक’ हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे?

उत्तर : सर्वेक्षण जहाज (Survey vessel ship)

3) ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’ पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर : ‘This moment’

4) नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले C- CARES वेब पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर : कोळसा क्षेत्र

5) छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?

उत्तर : रत्नागिरी

6) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे?

उत्तर : फ्रान्स

7) उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर : रितु बाहरी

8) केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे?

उत्तर : अपूर्व चंद्रा

9) सस्टेनेबल फायनान्स 2024 साठी द ॲसेट ट्रिपल ए अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट ग्रीन बाँड-कॉर्पोरेट’ पुरस्कार कोणाला देण्यात आला?

उत्तर : आरईसी लिमिटेड (REC Limited)

10) 2024 या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे? (जागतिक कर्करोग दिन – 4 फेब्रुवारी)

उत्तर : Close The Care Gap


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment