Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 3 जानेवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.
Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 January 2025
Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for competitive exams. Improving your Marathi General Knowledge of Current Affairs can help you perform better in various exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and other government exams.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर तुमचं हार्दिक स्वागत आहे! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.
चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 3 जानेवारी 2025
1) राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले आहे?
उत्तर : 2
2) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर : राहुल नार्वेकर (दुसऱ्यांदा)
3) 2025 मध्ये किती खेळाडूंना खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर : 4
4) रक्षा मंत्रालयाने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणते वर्ष ‘सुधारणांचे वर्ष’ (Year of Reforms) म्हणून नामांकित केले आहे?
उत्तर : 2025
5) अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणत्या ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शकाला दिला जाणार आहे?
उत्तर : सई परांजपे (Sai Paranjape)
6) UIDAI चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर : भुवनेश कुमार (Bhuvnesh Kumar)
7) संतोष ट्रॉफीच्या 78 व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
उत्तर : पश्चिम बंगाल
8) महिला कब्बडी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
उत्तर : भारत (बिहार)
9) राष्ट्रीय मानवधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : न्या.व्ही.रामसुब्रमण्यम
10) संजय मल्होत्रा हे आरबीआयचे कितवे गव्हर्नर असणार आहेत?
उत्तर : 26 वे
दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरांच्या अपडेट्ससाठी Google वर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.