Marathi Current Affairs – 3 January 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 3 जानेवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 January 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 3 जानेवारी 2024

1) महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्म दिवस 15 जानेवारी राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर : खाशाबा जाधव

2) राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केली आहे?

उत्तर : नाशिक

3) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने कोणत्या रॉकेटच्या मदतीने कृष्णविवराचा (Black hole) अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

उत्तर : PSLV-C58

4) जानेवारी 2024 मध्ये BRICS संघटनेची सदस्य देशांची संख्या किती होणार आहे?

उत्तर : 10

5) नुकतीच कोणत्या व्यक्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची पद व गोपनीयतेची शपथ घेतली?

उत्तर : रजनीश सेठ


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment