Marathi Current Affairs – 3 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 3 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 3 फेब्रुवारी 2024

1) जळगांव जिल्हयातील अमळनेर येथे 97 व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

उत्तर : सुमित्रा महाजन

2) कोणत्या संस्थेने “विद्युत 2024” हा अहवाल प्रसिद्ध केला आहे?

उत्तर : आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA)

3) थानथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य (Thanthai Periyar Wildlife Sanctuary), अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले, हे कोणत्या राज्यात आहे?

उत्तर : तामिळनाडू

4) 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे?

उत्तर : लखनौ (Lucknow)

5) भारतीय हवाई दलाकडून ‘वायू शक्ती’-24 हा सराव कोठे आयोजित केला जाईल?

उत्तर : जैसलमेर

6) 1 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारचे मुख्य जलविज्ञानी (Chief Hydrographer) म्हणून कोणी पदभार स्वीकारला?

उत्तर : हाइस ॲडमिरल लोचन सिंग पठानिया

7) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे?

उत्तर : सहाव्यांदा

8) सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : अरविंद पनगरिया

9) उत्तराखंड समान नागरी संहिता समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : रंजना प्रकाश देसाई

10) झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर : चंपई सोरेन


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment