Marathi Current Affairs – 29 January 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 29 जानेवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 January 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 29 जानेवारी 2024

1) महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलयानाचा बहुमान मिळवला आहे?

उत्तर : 3

2) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक 2024 साठी कोणत्या टॅग लाइन चे अनावरण केले आहे?

उत्तर : चुनाव का पर्व देश का गर्व

3) AI स्टार्टअप “कृत्रिम” 2024 मध्ये भारतातील पहिले युनिकॉर्न बनले. या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास कोणत्या भारतीय कंपनीने केला?

उत्तर : Ola

4) HDFC बँकेतील 9.99% स्टेक घेण्यासाठी RBI कडून कोणाला मंजुरी मिळाली आहे?

उत्तर : एलआयसी (LIC)

5) अलीकडेच नौदल कमांडर महासंचालक (डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स) ची भूमिका कोणी स्वीकारली?

उत्तर : व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद

6) नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

उत्तर : 9

7) नुकताच पुरुष दुहेरी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा दावा करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला?

उत्तर : रोहन बोपन्ना (वयाच्या 43 व्या वर्षी पुरुष दुहेरी क्रमवारीत प्रथम क्रमांक)

8) 84 वी अखिल भारतीय पिठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर : मुंबई

9) नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्याच्या प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे?

उत्तर : डोमिनिकन गणराज्य

10) महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय (पॉक्सो न्यायालय) कोठे होणार आहे?

उत्तर : पुणे


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment