Marathi Current Affairs – 27 January 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 27 जानेवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 27 January 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 27 जानेवारी 2024

1) आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : 26 जानेवारी

2) महाराष्ट्र पोलीस दलाला एकून किती राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत?

उत्तर : 62

3) महाराष्ट्रातील कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे?

उत्तर : सोमय मुंडे

4) भारतातील पहिले कार्बन-न्युट्रल स्पोर्ट्स सिटी कोठे असणार आहे?

उत्तर : कोची, केरळ

5) जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी TCS चे स्थान काय आहे?

उत्तर : दुसरे

6) तेलंगणातील कोणत्या जिल्ह्यात भारतीय नौदल आपले दुसरे VLF (Very Low Frequency (VLF) radar station) कम्युनिकेशन स्टेशन स्थापन करत आहे?

उत्तर : विकाराबाद

7) 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत?

उत्तर : इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron)

8) केंद्र सरकारतर्फे यावर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

उत्तर : 110

9) कोणता क्रिकेट खेळाडू ICC चा 2023 वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज ठरला आहे?

उत्तर : विराट कोहली

10) यावर्षीच्या देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे?

उत्तर : ‘विकसित भारत’ आणि ‘भारत -लोकशाहीची जननी’


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment