Marathi Current Affairs – 2 January 2025 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Admin

Published on:

Follow Us
Marathi Current Affairs

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 2 जानेवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 2 January 2025

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for competitive exams. Improving your Marathi General Knowledge of Current Affairs can help you perform better in various exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and other government exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर तुमचं हार्दिक स्वागत आहे! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 2 जानेवारी 2025

1) नुकतेच, भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोठे केले?

    उत्तर : लडाख

    2) नुकताच, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?

    उत्तर : रश्मी शुक्ला

    3) 2024 मध्ये परकीय चलन साठ्याच्या प्रमाणात भारताचा जागतिक क्रमांक काय होता?

    उत्तर : चौथा

    4) नुकतेच, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी किती वेळा भारताचे पंतप्रधान होते?

    उत्तर : 2 वेळा (2004 ते 2014)

    5) 2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तुल कप (Asian Rifle/Pistol Cup 2026) कोणत्या देशात होणार आहे?

    उत्तर : भारत

    6) भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे?

    उत्तर : लडाख

    7) पृथ्वीच्या कमी कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट) दोन अंतराळयानांदरम्यान डॉकींग आणि अनडॉकींग चाचणी घेण्यासाठी इस्रोने प्रक्षेपित केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?

    उत्तर : SpaDeX मिशन

    8) अग्नी वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोण-कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

    उत्तर : भारत आणि सिंगापूर

    9) भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नी वॉरियर 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते?

    उत्तर : महाराष्ट्र

    10) पशुगणना 2024 नुसार कोणते राज्य दुध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे?

    उत्तर : उत्तरप्रदेश


    दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरांच्या अपडेट्ससाठी Google वर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

    Leave a Comment