Marathi Current Affairs – 13 February 2024 : चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 13 फेब्रुवारी 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 13 February 2024

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | 13 फेब्रुवारी 2024

1) महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर : 8 लाख

2) देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे?

उत्तर : पुणे

3) 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे केले जात आहे?

उत्तर : लखनऊ

4) अलीकडेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये सुरू करण्यात आली?

उत्तर : श्रीलंका आणि मॉरिशस

5) IREDA ने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नावीन्य आणि संशोधनासाठी कोणाशी करार केला आहे?

उत्तर : आयआयटी (IIT) भुवनेश्वर

6) अलीकडेच चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?

उत्तर : सुमित नागल

7) अलीकडे, कोणत्या देशाच्या न्यायालयाने यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना मुक्त केले आहे?

उत्तर : कतार (Qatar)

8) फिट इंडिया मूव्हमेंटचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : नरेंद्रकुमार यादव

9) दुबईतील 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये भारतासह कोणत्या देशांना सन्माननीय अतिथी म्हणून निवडण्यात आले आहे?

उत्तर : तुर्की आणि कतार

10) महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री वायोश्री योजने’चा लाभ कोणाला मिळणार आहे?

उत्तर : 15 लाख ज्येष्ठ नागरिक (‘मुख्यमंत्री वायोश्री योजने’चा महाराष्ट्रातील शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.)


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Leave a Comment