Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20 सर्व विश्वचि व्हावे सुखी

By Nitin Tonpe

Published on:

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20 सर्व विश्वचि व्हावे सुखी that will help you solve the exercise and understand the concepts. Below you will find all the questions and answers for Chapter 20.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20 सर्व विश्वचि व्हावे सुखी

प्रश्न 1) खालील चौकटी पूर्ण करा.

उतर:

 • (अ) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना – पसायदान
 • (आ) मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे – मैत्री
 • (इ) ‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत – संत एकनाथ
 • (ई) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत – संत गाडगे महाराज
 • (उ) संत तुकारामांचे जीवनसूत्र – परस्पर सहकार्य

प्रश्न 2) आकृत्या पूर्ण करा.

उतर:

अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन :

 • (१) धर्मकार्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे.
 • (२) स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.
 • (३) सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.
 • (४) नेहमी सत्य तेच मांडावे.

उतर:

संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती :

 • (१) विनम्रता जोपासावी.
 • (२) सहृदय मनाने समरस झाले पाहिजे.
 • (३) परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे.
 • (४) अज्ञान नाहीसे करावे.

उतर:

संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष :

 • (१) सहृदय मनाने समरस होणे.
 • (२) दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे.
 • (३) दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे.
 • (४) आपपरभाव न मानणे.

प्रश्न 3) फरक सांगा

उतर:

सामान्य माणसाचे मागणेसंतांचे मागणे
(अ) वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात.(अ) सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे.
(आ) स्वतःपुरते मर्यादित(आ) विश्वव्यापक

प्रश्न 4) खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा.

(अ) जे खळांची व्यंकटी सांडो _________

(आ) दुरिताचे तिमिर जावो ___________

उतर:

 • (अ) जे खळांची व्यंकटी सांडो – माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.
 • (आ) दुरितांचे तिमिर जावो – (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व दुष्कर्माचा अंधार नष्ट होऊ दे.

प्रश्न 5) खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.

(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)

उतर:

अ. क्र.काव्यांशसंतांची नावेकाव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना
(१)‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’संत तुकडोजी महाराजविश्वकल्याण
(२)‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’संत नामदेवनम्रता
(३)‘सर्वांभूती भगवद्भावो’संत एकनाथमैत्रभाव
(४)‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’संत तुकारामसहकार्य
(५)‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’संत गाडगे महाराजस्वप्रयत्न

प्रश्न 5) स्वमत.

(अ) सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

उतर: संत स्वत:पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात, त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.

(आ) ‘भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उतर: या ओळीतील ‘भूत, मैत्र आणि जीव’ हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण ‘भूत’ होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती-गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.

(इ) या पाठातून तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.

उतर: सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात, अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.

भाषाभ्यास

खालील ओळींतील वृत्त ओळखा.

(अ)

उतर:

न दे खोश के त्याज ग ज्जीव ना सी
U – – यU – – यU – – यU – – य

हे भुजंगप्रयात अक्षरगणवृत्त आहे

(आ)

उतर:

स्व प रज न समू हा सौख्य का रीब ना वे
U U U
U U U
U U U
U U U
U U U

हे मालिनी अक्षरगुणवृत्त आहे.

(इ)

उतर:

नि ष्प्रा णदे ह पड ला श्रम ही निमा ले
– – U
– U U
U – U
U – U
– – 
ग ग 

हे वसंततलिका अक्षरगुणवृत्त आहे.

Leave a Comment