Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)

By Nitin Tonpe

Published on:

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20.1 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) that will help you solve the exercise and understand the concepts. Below you will find all the questions and answers for Chapter 20.1.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 20.1 व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)

प्रश्न 1) टिपा लिहा.

(अ) व्युत्पत्ती कोशाचे कार्य

उत्तर:

व्युत्पत्ती कोशाचे कार्य :

व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश!

व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :

 • (१) मराठी भाषेतील – प्रमाण व बोली – शब्दांचे मूळ रूप दाखवणे.
 • (२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
 • (३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
 • (४) भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.

(आ) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार

उत्तर:

शब्द तयार होण्याचे विविध प्रकार :

 • दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून.
 • उदा., इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द.
 • दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांतून.
 • उदा., ‘डॅम बीस्ट’ याचे जुन्या मराठीतले ‘डँबीस’ हे रूप.
 • दोन वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून.
 • उदा., फारसी ना हा उपसर्ग + पास हा इंग्रजी शब्द = नापास.
 • प्रत्यय आणि उपसर्ग लागून.
 • उदा., वारकरी प्रतिसाद

प्रश्न 2) खालील मुद्‌द्यांवर एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)

उत्तर:

व्युत्पत्ती कोश : एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.

१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.

प्रश्न 3) पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

उत्तर:

शब्द अनेकअर्थ एक
सागर, रत्नाकर, सिंधू, जलधीसमुद्र
शब्द एकअर्थ अनेक
तीरबाण, किनारा

भाषाभ्यास

खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

उपसर्गघटित शब्द
अचूक
अनाकलनीय
उपाहार
बेशक
प्रत्ययघटित शब्द
इनामदार
धारदार
मुलूखगिरी
शिष्टाई
दांडगाई
संशयित
शिलाई
अभ्यस्त शब्द
गल्लोगल्ली
घमघम 
आंबटचिंबट
धबाधब 
हुरहुर
हिरवाहिरवा
मधूनमधून
हुबेहूब
रस्तोरस्ती
तिळतिळ 
लुटूलुटू
वटवट 
मागोमाग

Leave a Comment