Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक

By Nitin Tonpe

Published on:

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 19 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक that will help you solve the exercise and understand the concepts. Below you will find all the questions and answers for Chapter 19.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक

प्रश्न 1) खालील आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – मळवाट
 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – खाचखळगे

उत्तर:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य –

 • (१) परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.
 • (२) मूक समाजाचे नेतृत्व केले.
 • (३) बहिष्कृत भारत जागा केला.
 • (४) चवदार तळ्याचा संग्राम केला.

प्रश्न 2) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.

उत्तर:

 1. मळवाट – पारंपरिक वाट
 2. खाचखळगे – अडचणी, कठीण परिस्थिती
 3. मूक समाज – अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज

प्रश्न 3) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.

उत्तर:

 • (१) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
 • (२) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.
 • (३) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.

प्रश्न 4) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

उत्तर:

पन्नास वर्षापूर्वीची परिस्थितीपन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती.सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
रणशिंग फुंकले होते.आता बिगूल वाट पाहत आहे.
चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.

प्रश्न 5) काव्यसौंदर्य.

(अ) ‘तुझे शब्द जसे की

महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत

तुझा संघर्ष असा की

काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.

उत्तर:

आशयसौंदर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.

भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. ‘महाकाव्याची नम्रता’ व ‘काठ्यांच्या बंदुका’ या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.

(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.

(ई) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

उत्तर: अतिशय कठीण परिस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाघ ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.

Leave a Comment