Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

By Nitin Tonpe

Published on:

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 Questions and Answers

In this article, we have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास that will help you solve the exercise and understand the concepts.

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 1) आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:

 • प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये
 • पदार्थांमधील कॅलरीज
 • आहारशास्त्र

उत्तर:

 • भात खाणे
 • दिवसा झोपणे
 • पत्ते खेळणे
 • बोलणे

उत्तर:

 • पंतांच्या पानात रोज चमत्कारिक पदार्थ पडू लागले.
 • एकदा नुसती पडवळे उकडून तिने पंतांना खायला दिली.
 • शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा या सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला.
 • कोबी, कॉलिफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळाची स्वयंपाक घरातून हकालपट्टी झाली.

प्रश्न 2) कारणे शोधा.

(अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ____

उत्तर: पंत टेलिफोन ऑपरेटर असल्याने त्यांना दिवसभर बोलण्याशिवाय पर्याय नव्हता.

(आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ____

उत्तर: ‘उपास’ हे बाबा बर्वेचे खास राखीव कुरण होते व नेमके तेच लेखक करू पाहत होता.

प्रश्न 3) पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

(अ) भीष्म प्रतिज्ञा

महाभारत या महाकाव्यातील भीष्माने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा त्याने जीवनाच्या अंतापर्यंत पाळली होती. त्यामुळे, तेवढ्या ताकदीने केलेल्या प्रतिज्ञेस भीष्म प्रतिज्ञा म्हणण्याचा प्रघात पडला. पाठामध्येही लेखकाने आपले अति प्रमाणात वाढलेले वजन कमी करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती प्रतिज्ञा साधीसुधी नसून ती भीष्म प्रतिज्ञा आहे असे लेखक मोठ्या उत्साहाने म्हणतो.

(आ) बाळसेदार भाज्या-

लेखकाने विनोद साधण्याच्या हेतूने भाज्यांचे सडपातळ आणि बाळसेदार म्हणजेच गुबगुबीत असे प्रकार पाडले. बाळसेदार भाज्या स्वयंपाकघरातून हाकलून दिल्याने पंतांच्या वजनक्षयाच्या संकल्पासाठी त्याची मदतच झाली आहे असे म्हटले आहे. गुबगुबीत (बाळसेदार) भाज्या खाल्ल्याने पंतांचे वजन वाढून तेही बाळसेदार होतील, म्हणून या भाज्या वापरणे बंद केले हा यामागील दडलेला विनोद आहे.

(इ) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो-

पंतांचे अवास्तव वाढलेले वजन कमी करण्याचा संकल्प हा पंतांसाठी फार अवघड जातो. त्यांच्या व्रतात येणारे अनेक अडथळे, पंतांची झालेली दोलायमान स्थिती, तरीही ठामपणे महिनाभर केलेली मेहनत, त्याग यांची परिणिती म्हणून त्यांचे वजन घटण्याऐवजी तब्बल अकरा पाैंडांनी वाढले. महिन्याभरात जीवाचे केलेले हाल आणि उडालेली तारांबळ, त्यातून शेवटी वजनकाट्याने दर्शवलेले वाढलेले वजन या साऱ्यामुळे पंत हैराण होतात, म्हणूनच वजनाचा मार्ग असंख्य काट्याकुट्यांतून म्हणजे त्रासातून आणि वजनाच्या काट्यातून जातो असे दोन अर्थ साधत या वजनक्षयाच्या संकल्पातील त्यांचे दु:ख त्यांनी वर्णिले आहे. येथे ‘काट्यांतून’ या शब्दाचे दोन्ही अर्थ चपखल बसतात व रंजक वाटतात.

(ई) असामान्य मनोनिग्रह-

मुळातच अफाट खाण्याची सवय असलेल्या, खाण्यापिण्यावर संयम नसलेल्या पंतांनी उपासाचा निर्णय घेणे ही असामान्य बाब होती. सुरुवातीला अनेक अडथळे येऊन, संकल्पाला सुरुंग लागूनही महिनाभर त्यांनी आपल्या मनावर दगड ठेवून आपले आवडते पदार्थ दूर सारले. ‘डाएट’ बाबतीत गंभीर होत मन घट्ट करून पथ्य पाळले. केवळ दोनदाच साखरभात, एकदा कोळंबीभात व वडाभात खाऊन इतर भात वर्ज्य करण्यासारखे असामान्य काम त्यांनी केले. त्यांचा हा निर्धार असामान्य असल्याने येथे लेखकाने असामान्य मनोनिग्रह हा अतिशय चपखल शब्द वापरला आहे.

प्रश्न 4) खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा.

उत्तर:

 • (अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे- व्रतभंग
 • (आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना- आहारपरिवर्तन
 • (इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह- वाक्प्रवाह

प्रश्न 5) अचूक शब्द ओळखून लिहा.

 • (अ) वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत :- वडिलांसोबत
 • (आ) तालमिला/तालमीला/ताल्मीला/ताल्मिला :- तालमीला
 • (इ) गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी :- गाऱ्हाणी

प्रश्न 6) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

उत्तर:

वाक्प्रचारवाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण(३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(आ) सुरुंग लावणे(४) एखादा बेत उधळवून लावणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे(१) खूप संताप येणे
(ई) मूठभर मांस चढणे(२) स्तुतीने हुरळून जाणे

प्रश्न 7) स्वमत.

(अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

उत्तर: बटाट्याच्या चाळीत राहणाऱ्या पंतांच्या घराचा दिवाणखाना खूप लहान होता. वजन कमी करण्याकरता तेथे दोरीउड्या मारायलाही जागा नव्हती. तरीही आपले प्रचंड वाढलेले वजन कमी करण्यासाठी पंत तेथे दोरीउड्या मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी मारलेली पहिली उडी ही शेवटची ठरते कारण त्या दोरीबरोबर एकदा ड्रेसिंग टेबलवरील सगळे साहित्य खाली येते, तर दुसऱ्या वेळी ती दोरी आचार्य बर्वे नावाच्या शेजाऱ्यांच्या गळ्यात पडते. ही दोरी त्यांच्या गळ्यात पडणे पंतांना फार महागात जाते कारण मौन या विषयावर पंतांना बर्व्यांचे तासभर प्रवचन ऐकावे लागते. खुसखुशीत विनोदांमुळे हा प्रसंग वाचताना खूप गंमत येते. मौनाचे महत्त्व सांगणारी व्यक्ती स्वत: मात्र अखंड बडबडत असलेली दिसते. शिवाय, मौन हा वजन कमी करण्याचा बर्व्यांनी सुचवलेला पर्यायही गमतीशीरच वाटतो.

(आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.

उत्तर: पंतांच्या वजन कमी करण्याच्या संकल्पाला त्यांची पत्नीही उत्साहाने साथ देत होती. जेवणातील सारी पथ्ये त्यांची पत्नी अगदी लक्षपूर्वक पाळत असे. पंतांनी उपास जाहीर करताच लेखकाच्या ताटात उकडलेल्या पडवळासारखे चमत्कारिक पदार्थ पाडण्याचे श्रेय त्यांच्या पत्नीलाच जाते. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, भेंडी अशा सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू करणे आणि कोबी, कॉलिफ्लॉवरसारख्या बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी करण्यासारखी महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली, त्यामागे त्यांचा उत्साह दडलेला दिसतो. त्यांनी पंतांना बिनसाखरेचा चहाही द्यायला सुरुवात केली. घरातील साखर संपेपर्यंत चहात साखर घालणे, मुलांसाठी लाडू बशीत काढून ठेवणे यांसारखे काही प्रसंग सोडले, तर ती पंतांच्या या संकल्पाला मोठ्या उत्साहात हातभार लावताना दिसते.

(इ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.

उत्तर: ‘उपास’ हा संपूर्ण पाठ विनोदी आहे; परंतु त्यातील सुरुवातीचा आहारपरिवर्तनाचा प्रसंग मला फार आवडला. पंतांनी बिनसाखरेचा चहा सुरू केला. दिवाळी केवळ तिखटमिठावर उरकायची घरात ताकीदही दिली. असे पंतांना वाटणारे मोठे बदल त्यांनी आहारात केले. याशिवाय, पंतांनी भातही वर्ज्य करायचे ठरवले; पण त्यांच्यातील संयमाचा अभाव येथेही दिसून आला. अत्यंत साळसूदपणे पंतांनी त्याचे स्पष्टीकरण देत पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केल्याचे अभिमानाने सांगितलेले दिसते. त्यांची ही शैली उत्तम विनोद निर्मिती साधताना दिसते.

(ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.

उत्तर: मी संकल्प केला; पण तो पूर्ण केला नाही ही गोष्ट माझ्या आई-वडिलांना नक्कीच आवडणारी नाही. त्यामुळे, बाबा या गोष्टीने माझ्यावर रागावतील, मला ओरडतील. आई-बाबांची प्रतिक्रिया ही नेहमीच एकमेकांना पूरक अशी असते. त्यामुळे, बाबा रागावल्यानंतर आई मला समोर बसवून बाबांच्या रागावण्याचं कारण समजावून सांगेल. माझी चूक, त्याचे परिणाम हे सगळं ती मला पटवून देईल. एवढंच नव्हे, तर मी माझा संकल्प कसा दृढ करावा, यासाठी ती मला मार्गदर्शनही करेल; पुन्हा संकल्प करण्यासाठी प्रेरित करेल. ताईची प्रतिक्रिया मला चिडवण्याची असेलच; पण तिचं चिडवणंही मी सकारात्मक पद्धतीने घ्यावं असाच आईचा सल्ला असेल. बाबांचा धाक, आईचं प्रेमळ मार्गदर्शन आणि ताईचं गमतीदार चिडवणं हे सगळं माझ्यासाठी प्रेरणा देणारं असेल हे नक्की.

Leave a Comment