Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता – संत एकनाथ

By Nitin Tonpe

Published on:

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 (संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता – संत एकनाथ) that will help you solving the exercise and understanding the concepts. Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 will help students complete their assignments and homework on time while supporting them in their board exam preparation. It will also help the students understand the concepts better.

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता – संत एकनाथ

प्रश्न 1) खालील चौकटी पूर्ण करा.

उत्तरः

 • (अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – चकोर
 • (आ) पिलांना सुरक्षितता देणारे – पक्षिणीचे पंख
 • (इ) चिरकाल टिकणारा आनंद – स्वानंदतृप्ती
 • (ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा – योगी

प्रश्न 2) खालील आकृती पूर्ण करा.

उत्तरः

प्रश्न 3) खालील तक्ता पूर्ण करा. योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

उत्तरः

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 Q3 Answer

प्रश्न 4) खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा.

 • (अ) जीभ –
 • (आ) पाणी –
 • (इ) गोडपणा –
 • (ई) ढग –

उत्तरः

 • (अ) जीभ – रसना
 • (आ) पाणी – जीवन, उदक, जल
 • (इ) गोडपणा – मधुरता
 • (ई) ढग – मेघ

प्रश्न 5) काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकी जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।

उत्तरः उपरोक्त पंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखाचा’ या अभंगातील असून, त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत. त्यांनी योगी पुरूषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरूष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे. एकनाथांनी योग्यांची तुलना पाण्याशी केली आहे, पण योगी पाण्यापेक्षा अतिश्रेष्ठ कसे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरीता उच्च लोकांतून इहलोकात खाली येतात. जन्म घेऊन हालअपेष्टा भोगतात ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालअपेष्टा भोगतात. कीर्तन कथेच्या माध्यमातून जनाना (लोकांना) संतुष्ट करतात. आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात.

(आ) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तरः संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे सांगताना ते म्हणतात – पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते; परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो. पाणी एकावेळची तहान भागवते; परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळांमध्ये सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख तात्पुरते आहे. पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुष सर्वांना अक्षय परमानंद देतो. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते. परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करते. पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रवणकीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो. अशा प्रकारे ‘योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे संत एकनाथांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले आहे.

(इ) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.

उत्तर: योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठीच झटतात. दोघेही जनतेची सेवाच करतात. पाणी हे मानवाला जीवनदायी आहे. प्राणिसृष्टी व वनस्पतिसृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसाची तहान तर भागवतेच; परंतु पोटाची भूकही भागवते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते. पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरारून उठते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते. योगी पुरुष हा या मृत्युलोकात जन्म घेतो. तपः साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो लोकांमध्ये श्रवणकीर्तनाने वाटतो. सर्वांना तो नेहमी सर्वकाळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय आनंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने नि:स्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो.

Leave a Comment