Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा – संत नामदेव

By Nitin Tonpe

Published on:

Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 Questions and Answers

In this article, we have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 (संतवाणी अंकिला मी दास तुझा – संत नामदेव) that will help you solving the exercise and understanding the concepts. Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 will help students complete their assignments and homework on time while supporting them in their board exam preparation. It will also help the students understand the concepts better.

Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा – संत नामदेव

प्रश्न 1) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

  • (अ) माता धावून जाते _____
  • (आ) धरणीवर पक्षिणी झेपावते _____
  •  (इ) गाय हंबरत धावते _____
  •  (ई) हरिणी चिंतित होते _____

उत्तरे:

  • (अ) माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडते.
  • (आ) धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते.
  • (इ) गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते.
  • (ई) हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.

प्रश्न 2) आकृती पूर्ण करा.

उत्तरे:

प्रश्न 3) कोण ते लिहा.

उत्तरे:

  • (अ) परमेश्वराचे दास – संत नामदेव
  • (आ) मेघाला विनवणी करणारा – चातक

प्रश्न 4) काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं ।।

भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।

उत्तर: झाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले , तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे झेप (उडी ) घेते. पिल्लाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. जेव्हा वासराला भूक लागते, तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हंबरत वासराकडे धावत जाते.

(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर: संत नामदेवांनी श्रीविठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत, अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई बाळाची काळजी घेते . त्याचे दुखले – खुपले मायेने पाहते. बाळाला काही लागले, तर तिचा जीव कासावीस होतो. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे. तेव्हा विठूमाउलीने आपला सांभाळ करावा ; पालन करावे ; संसाररूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी ; कृपा करावी, असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे.

(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: संत नामदेवांनी श्रीविठ्ठलाला माउली (आई) असे म्हटले आहे. जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते, तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा, तू माझ्यावर सतत करावास, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. संत नामदेवांनी प्राणी – पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे दिली आहेत. झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते, तेव्हा पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ते हंबरते. त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते. रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले, तर हरिणी चिंतीत होते. व्याकूळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्रीविठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. श्रीविठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा, अशी विनवणी संत नामदेव करतात.

(ई) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.

उत्तरः ‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशुंची, पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकूळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेकवेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीन आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेकवेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशू असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते.

Leave a Comment