Intelligence Bureau Recruitment 2025: The Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, has invited online applications for the post of Assistant Central Intelligence Officer Grade–II/Executive (ACIO-II/Exe). This recruitment drive will fill 3717 vacancies across various categories. Eligible candidates can apply at mha.gov.in. The last date to apply is August 10, 2025. Read below for eligibility criteria, selection process, salary details, and how to apply.
IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभाग ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर’ भरती 2025 www.SpardhaPariksha.com |
मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड-II/कार्यकारी’ या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली. ही भरती प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना 10 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. यामध्ये एकूण 3717 पदांची भरती करण्यात येणार असून त्यामध्ये 1537 पदे जनरल प्रवर्गासाठी, 442 पदे आर्थिक दुर्बल घटक (EWS) साठी, 946 पदे इतर मागासवर्गीय (OBC) साठी, 566 पदे अनुसूचित जाती (SC) साठी आणि 226 पदे अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव आहेत. ही भरती गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांमध्ये ACIO ग्रेड II/Executive पदांसाठी आहे. इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.
केंद्रीय गुप्तचर (इंटेलिजन्स ब्युरो) विभाग भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: इंटेलिजन्स ब्युरो (IB)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: गुप्तचर विभागात पर्मनंट नौकरीची संधी.
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर
पदांची संख्या: 3717 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) | 3717 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 3717 |
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा:
- 18 ते 27 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.650/-
- SC/ST/ExSM/महिला: रु.550/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.44,900/- ते रु.1,42,400/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 19 जुलै 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.