GMC Kolhapur Bharti 2024: Apply Online For 102 Various Posts
GMC Kolhapur Recruitment 2024: Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur, has announced the recruitment of 102 vacancies for various posts, including Laboratory Attendant, Helper, X-ray Attendant, Patient Attendant, and others. Interested and eligible candidates can apply online for GMC Kolhapur Recruitment 2024 through the official website, rcsmgmc.ac.in, until 20 November 2024. Read below for eligibility criteria, selection process, and other details. Keep visiting www.SpardhaPariksha.com for the latest recruitment updates.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या एकूण 102 जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट-ड संवर्गामधील प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, प्रयोगशाळा परिचर, रुग्णसेवक व इतर रिक्त पदे भरली जाणार असून, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, अर्ज शुल्क, अर्ज असा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे..
- संस्थेचे नाव: Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur
- जाहिरात क्र.: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024
- पदाचे नाव: विविध
- पदांची संख्या: 102 जागा
पदानुसार रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 08 |
2 | शिपाई (महाविद्यालय) | 03 |
3 | मदतनीस (महाविद्यालय) | 01 |
4 | क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
5 | शिपाई (रुग्णालय) | 08 |
6 | प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
7 | रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
8 | अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
9 | बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
10 | कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 102 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ: रु.900/-
वेतन श्रेणी: रु.15,000 ते रु.63,200
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धती: ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 31 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल. |
महत्वाच्या लिंक्स:
हि परीक्षा IBPS मार्फत होणार असून अर्ज लिंक लवकरच उपलब्ध होईल.
अधिकृत वेबसाईट | Website |
जाहिरात (Notification) | Download |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर 2024 साठी अर्ज कसा करायचा:
1) वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरच्या अधिकृत वेबसाईटला www.rcsmgmc.ac.in येथे जा. येथे तुम्हाला भरतीची संपूर्ण माहिती मिळेल. तुमची आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा, जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही.
2) पात्रता तपासा: तुम्ही दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करता का ते पाहा.
3) ऑनलाइन अर्ज भरा: सावधगिरीने सर्व माहिती नीट भरा आणि अर्ज सादर करा.
4) शुल्क भरा: अर्ज सादर केल्यानंतर, दिलेल्या पद्धतीने शुल्क भरावे.
5) प्रिंटआउट घ्या: अर्ज आणि शुल्काची प्रिंट घ्या.
6) तयारी सुरू ठेवा: संगणक आधारित परीक्षा (CBT) घेण्यात येणार आहे, परीक्षा आणि इतर सूचना वेळोवेळी वेबसाईटवर पाहत रहा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.