Marathi Current Affairs Questions and Answers – October 2025: मित्रांनो, या लेखात ऑक्टोबर 2025 मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचे प्रश्न व उत्तरे मराठीत (October 2025 Current Affairs in Marathi) दिले आहेत. हे सर्व प्रश्न MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, झेडपी भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले असून दररोजच्या सरावासाठी उपयुक्त आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी खालील ‘ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी’ प्रश्नोत्तरे वाचा.
Table of Contents
Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | October 2025 – PDF Download
These Marathi Current Affairs Questions and Answers for October 2025 will help you prepare better for competitive exams. Studying Current Affairs regularly strengthens your GK and increases your chances of scoring well in exams like MPSC, ZP Bharti, Police Bharti, Talathi Bharti, and other government exams.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर स्वागत आहे! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर ऑक्टोबर 2025 महिन्यातील सर्व चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. या लेखामध्ये ऑक्टोबर 2025 महिन्यात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पुरस्कार तसेच महाराष्ट्राशी संबंधित घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे मराठीत दिली आहेत.
चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | ऑक्टोबर 2025
स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.
महाराष्ट्र चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Maharashtra GK Questions)
1) महाराष्ट्र सरकार दरवर्षी 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा मध्ये कोणत्या योजनेव्दारे पाठवणार आहे?
उत्तर: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी
2) राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत (श्रेणी: ‘ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज’) सुवर्ण पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला?
उत्तर: रोहिणी ग्रामपंचायत, शिरपूर, धुळे
3) राज्यात 75 नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे उभारली जाणार त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे कोठे सुरू करण्यात येणार आहे?
उत्तर: प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर
4) अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अलीकडेच काय नाव बदलण्यात आले?
उत्तर: अहिल्यानगर रेल्वे स्टेशन
5) यावर्षी फिनिक्स विषय सन्मान पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले?
उत्तर: देवेंद्रजी फडणवीस
6) 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटकोणता ठरला?
उत्तर: श्यामची आई
7) एसआरपीएफ (SRPF) गट क्रमांक 20, चा ‘भूमिपूजन’ (पायाभरणी) कार्यक्रम नुकताच कोठे पार पडला?
उत्तर: वरणगाव (जळगाव)
8) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण कोणाच्या नावावर करण्यास केंद्राकडून अखेर परवानगी मिळाली?
उत्तर: लोकनेते दि. बा. पाटील
9) पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर: पुणे
10) पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन 2025 चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर: डॉ. संजय ओक
11) इराणी कप 2025 कोणी जिंकला?
उत्तर: विदर्भ (उपविजेता रेस्ट ऑफ इंडिया
12) इराणी कप 2025 ‘प्लेअर ऑफ द मॅच’ कोण ठरला?
उत्तर: अथर्व तायडे (143 धावा)
13) विदर्भने आतापर्यंत किती वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आणि त्यापैकी प्रत्येक वेळी इराणी कपदेखील जिंकला आहे?
उत्तर: तीन वेळा
14) इराणी चषक 2025 मध्ये विदर्भ या संघाचा कर्णधार कोण होता?
उत्तर: अक्षय वाडकर
15) हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या 74 व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाणे शहरातील महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सुनील करणाळे यांनी 55 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले ?
उत्तर: सुवर्णपदक
16) जगातील सर्वात रुंद बोगदा भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
उत्तर: महाराष्ट्र
17) गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची नियुक्ती झाली ?
उत्तर: इंद्रनील नाईक
राष्ट्रीय चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे
1) 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधींची कोणती जयंती साजरी करण्यात आली?
उत्तर: 156 वी
2) पोलिस स्मृतिदिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: 21 ऑक्टोबर
3) भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
उत्तर: 93 (दोन नविन गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव)
4) 2023 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर: मोहनलाल
5) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने (2023) कोणाला गौरविले?
उत्तर: राणी मुखर्जी
6) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 कोणाला विभागून मिळाला?
उत्तर : शाहरुख खान व विक्रांत मेस्सी
7) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) चे नवीन महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर : प्रवीर रंजन
8) हायड्रोजन तंत्रज्ञानाने रेल्वे चालवणारा भारत हा जगातील कितवा देश बनणार आहे?
उत्तर: पाचवा (जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन)
9) भारताचे पहिले ‘पंतप्रधान मित्र पार्क’ कोणत्या राज्यात बांधले जाईल?
उत्तर: मध्य प्रदेश
10) भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने ‘जल शक्ती एक्सरसाइज’ कोणत्या राज्यात आयोजित केला होता?
उत्तर: पंजाब
11) भारताचे महान्यायवादी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: आर. वेंकटरमणी (16 वे)
12) भारताचे दुसरे लोकपाल सध्या कोण आहेत?
उत्तर: अजय माणिकराव खानविलकर
13) रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: शिरीष चंद्र मुर्मू
14) RBI ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा परकीय चलन साठा कमी होऊन किती झाला आहे?
उत्तर: 702.57 बिलियन USD
15) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची’ (क्षमताः २८०० मेगावॅट) पायाभरणी कोठे केली आहे?
उत्तर: बांसवाडा (राजस्थान)
16) 2026 मध्ये भारत कोणत्या शहरात पहिला सीफूड कॉंग्रेस आयोजित करेल?
उत्तर: चेन्नई
17) ‘लिव्हिंग द विवेकानंद वे’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: निखिल यादव, अनन्या अवस्थी
18) UNESCO च्या जागतिक बायोस्फीअर रिझर्व्ह नेटवर्क (WNBR) मध्ये औपचारिकपणे भारताच्या कोणत्या बायोस्फीअर रिझर्व्ह समावेश करण्यात आले आहे?
उत्तर: हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कोल्ड डेझर्ट बायोस्फीअर रिझर्व्ह
19) कोणत्या निवडणुकीपासून EVM वरती पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र छापली जाणार आहेत ?
उत्तर: बिहार (विधानसभा निवडणूक)
20) ‘डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: रवी के. मिश्रा
21) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर: अहमदाबाद
22) भारताचे कम्युनिकेशन्स अकाउंट्सचे नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर: वंदना गुप्ता
23) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025 च्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणत्या शहरात केले?
उत्तर: गांधीनगर
24) भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन (FAL) कोठे स्थापित करत आहेत?
उत्तर: वेमगल (कर्नाटक)
25) राष्ट्रीय कैडेट कॉर्प्स (NCC) चे महासंचालक कोण बनले आहे?
उत्तर: वीरेंद्र वत्स (Lt. Gen. Virendra Vats)
26) मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा 2025 चा ‘राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार’ कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर : सोनू निगम
27) हिम बिबट्यांची संख्या मोजणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले?
उत्तर: हिमाचल प्रदेश व (83 हिम बिबटे)
28) बीएसएफच्या हवाई शाखेत पहिल्या महिला फ्लाइट इंजिनीअर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: भावना चौधरी
29) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : अनंत गोएंका
30) भारतात गुगलचे पहिले AI हब कोठे होणार आहे?
उत्तर: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम
31) टाटा ट्रस्टने ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्षांसाठी कोणाची निवड केली आहे?
उत्तर: एन. चंद्रशेखरन
32) संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर. मिलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे?
उत्तर: सोनाली घोष
33) कोणत्या भारतीय संस्थेने नवीन सायफन-आधारित थर्मल डिसेलिनेशन सिस्टम विकसित केली आहे?
उत्तर: भारतीय विज्ञान संस्था (IISC)
34) भारतातील पहिले ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ कोणते ठरले?
उत्तर: चंदीगड
35) विष्णुदास भावे गौरव पदक 2025 कोणाला मिळाला ?
उत्तर: नीना कुळकर्णी
36) बिहार विधानसभेत एकूण किती जागा (मतदारसंघ) आहेत?
उत्तर: 243
37) आंध्र प्रदेशमधील कोणते मंदीर देशातील पहिले एआय- AI मंदीर ठरले?
उत्तर: तिरुपती मंदीर
38) सरकारी व खासगी क्षेत्रासाठी ‘मासिक पाळी रजा धोरण’ राबवणार देशातील पहिलं राज्य कोणते ठरले?
उत्तर : कर्नाटक
39) भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वैपिंग आणि चार्जिंग स्टेशन कोठे सुरू करण्यात आले?
उत्तर: सोनीपत, हरियाणा (गाव -पंची गुजरान)
40) भारतातील पहिले ‘सौर ऊर्जा-चालित शहर’ कोणते ठरले?
उत्तर: सांची (मध्य प्रदेश)
41) कोंडारेड्डीपल्ली हे दक्षिण भारतातील पहिले 100% सौरऊर्जेवर चालणारे गाव बनले आहे. हे गाव कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: तेलंगणा
42) भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम (T-Chip) कोठे उघडण्यात आले आहे?
उत्तर: हैदराबाद
43) 2025 चा प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणाला दिला जाईल?
उत्तर: प्रा. बनवारीलाल गौर, वैद्य नीलकंदन मूस ईटी, वैद्य भावना प्राशर
44) आशियातील सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?
उत्तर: नवी दिल्ली
45) हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर: 85 वा
46) मिसेस युनिव्हर्स स्पर्धा 2025 विजेता कोण ठरली?
उत्तर: शेरी सिंह (भारत)
47) ‘अपोलो अथेना’ (Apollo Athenaa) या आशियातील पहिल्या महिला कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले?
उत्तर: नवी दिल्ली
48) भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने ‘जल शक्ती एक्सरसाइज’ कोणत्या राज्यात आयोजित केला होता?
उत्तर: पटियाला, पंजाब
49) ‘द ब्रह्मास्त्र अनलीश्ड’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: टी. शिवनंदन
50) भारताचे पहिले मानवी अंतराळयान मिशन, ‘गगनयान’ कोणत्या वीं लाँच केले जाईल?
उत्तर: 2027
51) काटी बिहू सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
उत्तर: आसाम
52) भारताने किती क्षेत्रांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक असलेले पहिले हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य नियम 2025 जारी केले आहेत?
उत्तर: 4 क्षेत्रांसाठी
53) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस एलसीए एमके-1ए (Tejas LCA MK 1A) लढाऊ विमानाच्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर: नाशिक
54) अदानी आणि गुगल संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठे एआय डेटा हब कोणत्या शहरात बांधणार आहे?
उत्तर: विशाखापट्टणम
55) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, कोणते राज्य सर्वाधिक UPI व्यवहार असलेले राज्य बनले आहे?
उत्तर: तेलंगणा
56) भारत सरकारने अलीकडेच 16व्या वित्त आयोगाचा कालावधी वाढवला?
उत्तर: 30 नोव्हेंबर 2025
आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे
1) जागतीक अन्न दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: 16 ऑक्टोबर
2) जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत ‘समुदाय पसंती’ परस्कार (वर्ड्स बेस्ट स्कूल – कम्युनिटी चॉइस अवॉर्ड) कोणाला जाहीर झाला?
उत्तर: जालिंदरनगर प्राथमिक शाळेला (पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील)
3) वर्ड्स बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉइस अवॉर्ड कोण प्रदान करीते?
उत्तर: जागतिक शैक्षणिक संस्था टी फोर एज्युकेशनकडून
4) 2025 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर: जॉन क्लार्क, मिशेल डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस (John Clarke, Michel H. Devoret, and John M. Martinis)
5) 2025 चा नोबेल वैद्यकशास्त्र पुरस्कार कोणाला कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर: मेरी ई. ब्रेको, फ्रेड राम्सडेल, शिमोन साकागुची (Mary E. Brunkow, Fred Ramsdell, and Shimon Sakaguchi)
6) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला?
उत्तर: जोएल मोकिर (डच), फिलिप अधियन (फ्रान्स), पीटर होंविट (कॅनडा) (Joel Mokyr, Philippe Aghion, and Peter Howitt)
7) आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर: भारत
8) ‘2025 चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ विजेता कोण ठरले?
उत्तर: डॉ. हिमांशू कुलकर्णी
9) बेरेचिड (मोरोक्को) येथे भारतातील पहिल्या परदेशी संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
उत्तर: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
10) संयुक्त राष्ट्रांनी जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: अमिता चौधरी
11) वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 सलग 8व्यांदा प्रथम (सर्वात आनंदी देश) कोणता ठरला?
उत्तर: फिनलँड
12) वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 नूसार भारत जगात कितव्या स्थानी आहे?
उत्तर: 126 वा क्रमांक
13) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर: 38 वा
14) भारतात पहिले जागतिक सागवान परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?
उत्तर: कोची
15) कोणता देश जागतिक वन निधीमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश बनला आहे ?
उत्तर: ब्राझील
16) कौशल्ये आणि व्यवसायांना जागतिक मान्यता देण्यासाठी भारताने कोणासोबत करार केला आहे?
उत्तर: आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
17) गौरंगलाल दास यांची कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: दक्षिण कोरिया
18) गाझातील युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची किती कलमी योजना जाहीर केली?
उत्तर: 20 कलमी योजना
19) आशियातील सर्वात मोठ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
उत्तर : दिल्ली
20) भारताने कोणत्या देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक स्थापित करण्यासाठी करार केला आहे?
उत्तर: भूतान
21) आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान देण्यात आले आहे?
उत्तर: सिंगापूर
22) 11 वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर: दुबई
23) ‘आय एम जॉर्जिया माय रूट, माय प्रिन्सिपल’ हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे?
उत्तर : जॉर्जिया मेलोनी
24) 500 अब्ज डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे?
उत्तर : एलोन मस्क
25) 3 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाने आपला 94 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?
उत्तर: इराक
26) 2025 ची मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर: प्रिटोरिया (Pretoria, South Africa)
27) 2025 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या पहिल्या चक्रीवादळाला ‘शक्ती’ नाव देण्यात आले. हे नाव कोणत्या देशाने दिले?
उत्तर: श्रीलंका
28) जपानला मिळणाऱ्या पहिली महिला पंतप्रधान सनाए ताकाईच कोणत्या पार्टीच्या नेत्या आहेत ?
उत्तर: लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी
29) 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद 1 ते 2 ऑक्टोबर 2025 कोठे पार पडली ?
दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुबई
30) आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना (ISSA) 2025 पुरस्कार ‘Outstanding Achievement in Social Security’ या प्रकारात कोणत्या देशाला मिळाला?
उत्तर: भारत
31) 2025 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या शहरांत आहे?
उत्तर: टोकियो
32) अंटार्क्टिकामध्ये भारताने स्थापन केलेल्या चौथ्या संशोधन केंद्राला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर: मैत्री 2 (Maitri II) 1. दक्षिण गंगोत्री (1983-1990), 2. मैत्री (1989), 3. भारती (2012)
33) ऑस्ट्राहिंद 2025 संयुक्त लष्करी युद्ध सराव भारत-ऑस्ट्रेलिया यांचात 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान कोठे कोठे पार पडला?
उत्तर: पर्थ, ऑस्ट्रेलिया
34) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: डॅन कॅट्झ
35) आईकडून बाळाला होणारे HIV, सिफिलीस आणि हेपेटायटीस B या तिन्ही रोगांचे संक्रमण रोखणारा (‘ट्रिपल एलिमिनेशन’) जगातील पहिला देश कोणता ठरला?
उत्तर: मालदीव
36) ग्लोबल फायनान्सने अलीकडेच कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बैंक म्हणून घोषित केले आहे?
उत्तर: DBS बैंक
37) जगातील सर्वात उंच पूल ‘ग्रैंड कॅन्यन ब्रिज’ कोणत्या देशात आहे?
उत्तर : चीन (गुईझोऊ प्रांतातील हुआजियांग) उंची: पुलाच्या डेकची उंची नदीच्या तळापासून 625 मीटर (2051 फूट)
38) इंटरस्टेलर मॅपिंग अँड अक्सिलरेशन प्रोब (IMAP) मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली होती?
उत्तर : नासा
39) मर्कोसुर-भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली?
उत्तर: ब्राझील
40) भारत आणि कोणत्या देशादरम्यान 5 वा समुद्र शक्ती नौदल सराव पार पडला?
उत्तर: इंडोनेशिया
41) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताची सातव्यांदा निवड झाली. भारताची सदस्यता कार्यकाळ कधी पासून सुरू होत आहे?
उत्तर: 1 जानेवारी 2026 पासून
42) दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: 20 ऑक्टोबर
43) आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बैंक (AIIB) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: बीजिंग (चीन)
क्रीडा चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे
1) FIDE महीला विश्वचषक 2025 साठी वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली भारतीय खेळाडू कोण ठरली ?
उत्तर: ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुख
2) बेंगळुरू येथे झालेल्या 74 व्या इंटर सर्व्हिसेस अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये नीरज चोप्राचा विक्रम कोणी मोडला आहे?
उत्तर: शिवम लोहकरे
3) जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित धनुर्विद्या लीग कोणत्या देशात सुरू करण्यात आली?
उत्तर: भारत
4) भारताच्या रिंकू हुड्डा याने ‘एफ 46’ विभागातील भालाफेक प्रकारात 66.37 मीटर कामगिरी करून पॅरा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील कोणते पदक जिंकले?
उत्तर: सुवर्णपदक
5) पॅरा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या ‘एफ 56’ विभागात थाळीफेक प्रकारात भारताचा योगेश कथुनिया कोणत्या पदकाचा मानकरी ठरला?
उत्तर: रौप्यपदक
6) स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
उत्तर: आनंद कुमार
7) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण बनला आहे?
उत्तर: अर्शदीप सिंग
8) बॅलन डी’ओर 2025 (2025 Ballon d’Or) पुरस्कार पुरुष विजेते कोण ठरले?
उत्तर: ओस्मान डेम्बेले (Ousmane Dembélé) (फ्रान्स)
9) बॅलन डी’ओर 2025 (2025 Ballon d’Or) पुरस्कार महिला विजेती कोण ठरली ?
उत्तर: एताना बोन्माती (Aitana Bonmatí) (स्पेन)
10) सलग तीन वेळा महिला बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे?
उत्तर: एताना बोन्माती (Aitana Bonmatí) (स्पेन)
11) आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ‘ब्रिग इट होम’ (Bring It Home) हे अधिकृत गाणे कोणी गायले, जे नुकतेच अनावरण करण्यात आले?
उत्तर: श्रेया घोषाल
12) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 37 वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: मिथुन मन्हास
13) बीसीसीआयचे सचिव कोण आहेत?
उत्तर: देवजित सैकिया
14) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि 2025 च्या महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान समान संधी आणि बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुलांना वचन द्या’ मोहीम कोणी सुरू केली आहे?
उत्तर: युनिसेफ (UNICEF)
15) फ्रेंच ओपन 2025 चे विजेते कोणी पटकावले?
उत्तर: कार्लोस अल्कारेज (Carlos Alcaraz)
16) अमेरिकन ओपन पुरूष एकेरी 2025 चा विजेता कोण ठरला?
उत्तर: कार्लोस अल्कारेज – स्पेन (उपविजेता – जानिक सिन्नर)
17) जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सिडनी मॅकलॉघलिन-लेव्होनने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कोणते पदक पटकावले ?
उत्तर: सुवर्णपदक
18) आशियाई कॅडेट कप 2025 चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
उत्तर: उत्तराखंड
19) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय महीला खेळाडू कोण ठरली ?
उत्तर: स्मृती मानधना
20) महिला क्रिकेट विश्वकप 2025 कोणत्या देशात पार पडला?
उत्तर: भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे
21) पहिला महिला Blind T20 क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या देशांनी आयोजित केला होता?
उत्तर: भारत व श्रीलंका
22) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर: रोहित पवार
23) महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर: अजित पवार
24) आशिया क्रिकेट कप 2025 चे विजेतेपद भारताने मिळवले. हे भारताचे कितवे विजेतेपद आहे?
उत्तर: 9 वे
25) आशिया क्रिकेट कप 2025 चा मालिकावीर कोण ठरला?
उत्तर: कुलदीप यादव (17 विकेट्स)
26) फिफा विश्वकप 2026 कोठे नियोजीत आहे?
उत्तर: USA, कॅनडा आणि मेक्सिको
27) ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय ज्युडो खेळाडू कोण बनली आहे?
उत्तर: हिमांशी टोकस (Himanshi Tokas)
28) अलिकडेच निवृत्त झालेले सॅम्युअल उम्टिती (Samuel Umtiti) कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर: फुटबॉल
29) अबिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने कोणते पदक जिंकले ?
उत्तर: सुवर्णपदक
30) नॉर्वे येथे झालेल्या 2025 च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले?
उत्तर: रौप्य पदक
31) जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 2025 भारताने किती पदके जिंकले?
उत्तर: 22 पदक (6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्यपदक )
32) जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 2025 मध्ये प्रथम स्थनी कोणता देश आहे?
उत्तर: ब्राझील (44 पदक)
33) 11 व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान कोठे पार पडली?
उत्तर: वीर सावरकर क्रीडा संकुल अहमदाबाद, गुजरात
34) 11 व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: 11 वा क्रमांक (भारत (13 पदके) – 0 सुवर्ण, 4 रौप्य, 9 कांस्य
35) 11 व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
उत्तर: चीन (54 पदके) – 40 सुवर्ण, 10 रौप्य, 4 कांस्य
36) भारत कोणत्या वर्षीच्या कॉमनवेल्थ गेम्स चे आयोजन करणार आहे?
उत्तर: 2030
37) नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर: राजपुताना रॉयल्स
38) 69 व्या राष्ट्रीय शालेय खेळांचे उद्घाटन कोठे झाले?
उत्तर: जम्मू आणि काश्मीर
39) बिहारची पहिली महिला FIDE मास्टर कोण बनली?
उत्तर: मरियम फातिमा
40) आंध्र प्रदेशात झालेल्या 62 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोणी विजय मिळवला ?
उत्तर: पी. इनियान (Grandmaster P Iniyan)
41) कोणत्या शहरात भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (Boxing Federation of India – BFI) प्रथमच बीएफआय कप 2025 (BFI Cup 2025) चे आयोजन करणार आहे?
उत्तर: चेन्नई
42) इंग्लिश प्रीमियर लीगने भारतात आपल्या ब्रँड अँबेसडर म्हणून कोणाची निवड केली आहे?
उत्तर: संजू सॅमसन
43) ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक विजेते कोण बनले?
उत्तर: लिंथोई चानम्बम (Linthoi Chanambam)
44) तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकले?
उत्तर: कांस्यपदक
45) अहमदाबाद येथे झालेल्या 11 व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदक जिंकले?
उत्तर: 10 पदके
46) इजिप्तमध्ये झालेल्या 2025 च्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या जॉबी मॅथ्यूने कोणते पदक जिंकले?
उत्तर: कांस्यपदक
47) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक असिस्टेड गोल स्कोअरर कोण बनला आहे?
उत्तर: लिओनेल मेस्सी
48) FIDE चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर: आर्काडी ड्वोरकोविच (Arkady Dvorkovich)
49) 2025 सालासाठी कोणत्या खेळाडूला गोल्डन बूट देण्यात आला आहे?
उत्तर: लिओनेल मेस्सी
50) खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?
उत्तर: राजस्थान
51) U20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025 विजेता कोणता देश ठरला?
उत्तर: मोरोक्को (उपविजेता- अर्जेंटिना)
52) प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर: भालाफेक
दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरांच्या अपडेट्ससाठी Googleवर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.
