[100+] Marathi Current Affairs February 2025 | चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (फेब्रुवारी 2025)

Advertisements

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | February 2025

Marathi Current Affairs Questions and Answers for February 2025 are helpful for competitive exams. Improving your Marathi General Knowledge of Current Affairs (Chalu Ghadamodi) can help you perform better in various exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and other government exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर स्वागत आहे! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर फेब्रुवारी 2025 महिन्यातील सर्व चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.

Marathi Current Affairs PDF Download – February 2025

मित्रांनो, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही फेब्रुवारी 2025 महिन्यातील चालू घडमोडी PDF सहजपणे डाउनलोड करू शकता.

Marathi Current Affairs – February 2025 (PDF Available Soon)

चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तरे | फेब्रुवारी 2025

या पेजवर फेब्रुवारी 2025 मधील मराठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान (GK) प्रश्न-उत्तर दिले आहेत. हे सर्व प्रश्न-उत्तर विविध विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित असून, महाराष्ट्र, भारत, आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या घटनांचा समावेश करण्यात आला आहे.

फेब्रुवारी 2025 मधील चालू घडामोडींचा हा संग्रह MPSC, पोलीस भरती, तलाठी, ZP भरती, आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

1) कला क्षेत्रासाठी महाराष्ट्रातील कोणत्या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : अशोक सराफ

2) विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?

उत्तर : मराठी भाषा विभाग

3) मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

उत्तर : किरण कुलकर्णी

4) महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 विजेती कोण ठरली ?

उत्तर : भाग्यश्री फंड (उपवेजेती – अमृता पुजारी)

5) भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

उत्तर : महाराष्ट्र

6) महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : डॉ. रमेश सूर्यवंशी

7) छत्रपती संभाजीनगर येथील 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर : अशोक राणा

8) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता कोण ठरला आहे?

उत्तर : पृथ्वीराज मोहोळ

9) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 उपविजेता कोण ठरला आहे?

उत्तर : महेंद्र गायकवाड

10) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे?

उत्तर : टेनिस

11) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर : सुवर्णपदक

12) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजीमध्ये किती सुवर्णपदके जिंकली आहेत?

उत्तर : 3

13) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे?

उत्तर : लोणार

14) 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे?

उत्तर : महाराष्ट्र

1) वने व वन्यजीव यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कोणाला 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

उत्तर : चैत्राम पवार

2) माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर : दुसऱ्या

3) माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे?

उत्तर : राजस्थान

4) मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर : विलास वाडेकर

5) राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर : एकता कुमारी

6) प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते, या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते?

उत्तर : कर्तव्यपथ

7) प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले?

उत्तर : सुवर्ण भारत : वारसा आणि विकास

8) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे?

उत्तर : 7

9) समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य हे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

उत्तर : उत्तराखंड

10) 24 जानेवारी 2025 च्या राष्ट्रीय बालिका दिवसा ची थीम कोणती होती?

उत्तर : उज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण

11) आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे?

उत्तर : दिब्रुगड

12) भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर : संजय मल्होत्रा (26 वे)

14) आर्थिक पाहणी अहवाला 2024-25 नुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे?

उत्तर : 46 टक्के

15) देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे ?

उत्तर : सिक्कीम

16) भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?

उत्तर : 89

17) कोणत्या ठिकाणी दहावा विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?

उत्तर : पणजी (गोवा)

18) 2025 वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे ?

उत्तर : 33वा

19) कोणत्या भारतीय लेखकाला Erasmus Prize 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : अमिताभ घोष

20) एअरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कोठे सुरु होत आहे?

उत्तर : बंगळुरू

21) कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान 4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे?

उत्तर : 2027

22) दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?

उत्तर : 48

23) फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर : कोलकाता

24) भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?

उत्तर : फरिदाबाद

25) उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?

उत्तर : हिमाचल प्रदेश

26) देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे?

उत्तर : DRDO आणि आयआयटी हैद्राबाद

27) उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?

उत्तर : हिमाचल प्रदेश

28) आगामी आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकासदर गाठेल असा अंदाज RBI ने वर्तविला आहे?

उत्तर : 6.7 टक्के

29) बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?

उत्तर : बेल्जियम

30) कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅचले यांना 2024 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे?

उत्तर : चिली

31) ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानांच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे?

उत्तर : 4

32) भारताचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?

उत्तर : अमेरिका

33) भारताचे जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे?

उत्तर : 2

34) किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये वरून किती लाख करण्यात आली आहे?

उत्तर : 5 लाख

35) केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत देशभरात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर : 40

36) केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग व निसर्गोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत?

उत्तर : 10

37) अटल भूजल योजनेचा कालावधी कधी पर्यंत वाढवण्यात आला आहे?

उत्तर : 2028

38) Golden peacock CSR अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?

उत्तर : Coal India Limited

39) कोणत्या राज्यातील Foy सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे?

उत्तर : राजस्थान

1) बीसीसीआयद्वारे सी. के. नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो, ते कोण होते?

उत्तर : भारतीय क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार

2) सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर : सचिन तेंडुलकर

3) भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे?

उत्तर : जसप्रीत बुमराह

4) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपालदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : अरुण मिश्रा

5) सी. के नायडू जीवनगौरव पुरस्काराचे सचिन तेंडुलकर कितवे मानकरी ठरले?

उत्तर : उत्तर : 31वे

6) सी. के नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे?

उत्तर : 1994

7) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

8) राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले?

उत्तर : 4

9) राष्ट्रपतींच्या हस्ते किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचे वितरण करण्यात आले?

उत्तर : 32

10) 14 व्या सीनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावले आहे?

उत्तर : ओडिसा

11) FIFA World Cup 2034 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर : सौदी अरेबिया

12) आशिया महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले आहे?

उत्तर : जपान

13) नुकतेच कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला आहे?

उत्तर : स्टीव्ह स्मिथ

1) आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?

उत्तर : मायकल मार्टिन

2) जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे?

उत्तर : अमेरिका

3) युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत?

उत्तर : कॅथरीन रसेल

4) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

उत्तर : 26

5) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?

उत्तर : 24.2 कोटी

6) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी भारतातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?

उत्तर : 5.47 कोटी

7) जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 4 फेब्रुवारी

8) समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे?

उत्तर : नेदरलँड

9) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : 2025

10) संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?

उत्तर : दुसरी (पहिल्यांदा 2012)

11) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे?

उत्तर : सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी

12) कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर :  नेपाळ

13) युनेस्कोच्या वेटलैंड सिटीमध्ये भारतातील कोणत्या शहरांचा समावेश झाला आहे?

उत्तर : इंदूर आणि उदयपूर

14) ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?

उत्तर : मॅडिसन कीज

15) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथम स्थानी असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर : ब्रिटन

16) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे?

उत्तर : मेसाचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (प्रथम स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ)

17) कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : जॉर्जिया

18) कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : संयुक्त अरब अमिराती

19) वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोठे होणार आहे?

उत्तर : नवी दिल्ली

20) भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे?

उत्तर : इंडोनेशिया

21) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?

उत्तर : दक्षिण सुदान

22) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक संपन्न झालेले दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?

उत्तर : स्वित्झर्लंड

23) कोलोरॅडो, यूएसए येथे झालेल्या अंडर-19 जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली?

उत्तर : 4 सुवर्णपदके

24) एशियन विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?

उत्तर : चीन

25) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे?

उत्तर : उत्तर प्रदेश

26) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमणने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर : सुवर्ण पदक

27) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर : 96

28) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशांत सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे?

उत्तर : डेन्मार्क

29) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल च्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या कोणत्या देशांत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे?

उत्तर : दक्षिण सुदान

30) जोथम नापत यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?

उत्तर : वानूआतु (Vanuatu)

31) ग्लोबल टीचर प्राईझ 2025 कोणी जिंकला आहे?

उत्तर : मंसूर-अल-मंसूर (सऊदी अरब)

32) कोणाला नाइटहुड पुरस्काराने अलिकडे सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : एन. चंद्रशेखरन

33) भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे?

उत्तर : अमेरिका

34) वर्षे 2024 मधे भारत हा अमेरिकेचा कितव्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश राहिला आहे?

उत्तर : 10

35) भारत आणि अमेरिकेची व्यापार तूट किती अब्ज डॉलर आहे?

उत्तर : 45 अब्ज डॉलर

36) दोन दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरू होत आहे?

उत्तर : फ्रान्स

37) Chang e -7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे?

उत्तर : चीन

38) तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे?

उत्तर : फिलिपाईन्स

39) आतापर्यंत भारत देशाआधी कोणत्या देशांनी डॉकिंग यशस्वी केले आहे?

उत्तर : अमेरिका, रशिया, चीन

40) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे?

उत्तर : कांगारू

41) संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्षे क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे?

उत्तर : 2025


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरांच्या अपडेट्ससाठी Google वर SpardhaPariksha.com किंवा Spardha Pariksha सर्च करा.

Advertisements

Leave a Comment