[PDF] Current Affairs in Marathi 2025: चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे

Marathi Current Affairs Today 2025: If you are preparing for competitive exams and aiming for success, staying updated with daily current affairs in Marathi is essential. Through Spardha Pariksha Current Affairs, you can access the latest and most reliable daily Marathi current affairs for 2025, covering exams like MPSC, PSI, STI, ASO, Talathi Bharti, Police Bharti, SSC, Banking, Railway, and more. Find Marathi Current Affairs, Questions and Answers, Quizzes, and downloadable PDFs below.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवर स्वागत आहे! आजकाल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व प्रचंड वाढले आहे, आणि हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन, आमच्या वेबसाइटवर मासिक चालू घडामोडी मोफत उपलब्ध करून देत आहोत! स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ‘चालू घडामोडी’ हा विषय खूप महत्त्वाचा असून, दिवसेंदिवस प्रश्नपत्रिकांमध्ये यावर जास्त भर दिला जात आहे. त्यामुळेच, आम्ही spardhapariksha.com वर चालू घडामोडींवर आधारित जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉमवरील चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे (Marathi Current Affairs Questions) विश्वासार्ह बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यामुळे एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी, आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये सहज लक्षात ठेवता येतील.

✅ ही पोस्ट दररोज सकाळी 8 वाजता नवीन चालू घडामोडींसह अपडेट केली जाते.

Maharashtra GK Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 2025 प्रश्न उत्तर मराठी [PDF]

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतातील नवीनतम चालू घडामोडींशी अद्ययावत राहणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात प्रभावशाली राज्यांपैकी एक असल्याने, परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्याच्या अलीकडील घडामोडींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.

या पेजवर राजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती, पर्यावरण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरील चालू घडामोडींचा समावेश आहे, जे तुम्हाला परीक्षा तसेच मुलाखतींमध्ये विचारले जाणारे प्रश्न सोडवण्यास मदत करतील. स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) वर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या पेजच्या माध्यमातून तुम्ही नवीनतम आणि अचूक चालू घडामोडी माहिती मिळवू शकता!

Monthly Current Affairs in Marathi
Marathi Current Affairs – January 2025
Marathi Current Affairs – February
Marathi Current Affairs – March
Marathi Current Affairs – April

Chalu Ghadamodi (चालू घडामोडी प्रश्न-उत्तरे): Current Affairs in Marathi 2025

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) has proven to be very helpful for aspirants preparing for competitive exams. It is a dynamic topic that keeps updating every moment, as new events continuously unfold across the country and the world. Therefore, staying updated with today’s Current Affairs in Marathi is essential. You can find complete information on Marathi Current Affairs below.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 16 May 2025

  • भारतात राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा केला जातो? – 16 मे
  • दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो? – 25 मे
  • जागतिक सुलभता जागरूकता दिनानिमित्त समावेशक भारत शिखर परिषद 2025 (Inclusive India Summit 2025) कुठे आयोजित केली जाणार आहे? – नवी दिल्ली
  • भारतीय लष्कराचा ‘तीस्ता प्रहार’ (Teesta Prahar) सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? – पश्चिम बंगाल
  • बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला ‘शक्ती’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? – श्रीलंका
  • स्वीडनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – अनुराग भूषण (IFS: 1995)
  • देशात यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे? – उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्रात यंदा किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे? – 80 लाख 95 हजार टन (महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर)

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 15 May 2025

  • सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळू (एम-सँड) वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने (M-Sand Policy) धोरण सुरू केले आहे? – महाराष्ट्र
  • भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच कोणी शपथ घेतली आहे? – न्या. भूषण गवई
  • न्या. भूषण गवई यांनी देशाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? – 52 वे
  • न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत? – 7 वे
  • मे 2025 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – डॉ. अजय कुमार
  • भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (Inland Waterways Authority of India – IWAI) जलवाहतूक प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचे नवीन कार्यालय कोठे स्थापन केले आहे? – श्रीनगर
  • नुकतेच, कोणत्या खेळाडूला भारतीय सैन्यदलात मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले आहे? – नीरज चोप्रा
  • तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे? – बुद्धिबळ
  • भारताने अलीकडेच कोणत्या कमी किमतीच्या काउंटर-ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली? – भार्गवास्त्र
  • 2025 च्या तिरंदाजी विश्वचषकात (Archery World Cup 2025) भारताने किती पदके जिंकली? – 7 (2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके)

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 13 May 2025

  • नुकतेच, महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत? – 150
  • देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे? – 31 टक्के
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल आहे? – महाराष्ट्र
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा अव्वल आहे? – छत्रपती संभाजीनगर
  • जगभरातील परिचारिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो? – 12 मे
  • पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि सिंचन सुधारण्यासाठी तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी मध्य-प्रदेशसह कोणत्या राज्याने सामंजस्य करार केला? – महाराष्ट्र
  • बागलिहार जलविद्युत प्रकल्प धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? – चिनाब
  • दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? – तिरंदाजी (Archery)
  • भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असून त्याने कसोटी सामन्यात एकूण किती धावा केल्या आहेत? – 9230
  • 72 वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? – तेलंगणा

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 12 May 2025

  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? – राम कदम
  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? – राहुल कुल
  • महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरन प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? – मध्यप्रदेश
  • एप्रिल 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल भारत सरकारच्या ब्रीफिंगचे नेतृत्व कोणी केले? – विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी
  • संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) ने प्रसिद्ध केलेल्या 2025 च्या मानव विकास अहवालात 193 देशांपैकी भारताचा क्रमांक कितवा आहे? – 130 वा
  • केरळमधील भारतातील सर्वात लांब आणि रामसर स्थळ म्हणून ओळखले जाणारे कोणते सरोवर सध्या गंभीर पर्यावरणीय ऱ्हासाचा सामना करत आहे? – वेंबनाड सरोवर (Vembanad Lake)
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकीकरण (PMFME) योजना लागू करण्यात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? – बिहार
  • अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे? – ऑपरेशन शिवा
  • केंद्राने CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? – 1 वर्षांनी
  • राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? – विशाखापट्टणम

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 11 May 2025

  • RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – पुनम गुप्ता
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वाहन निर्मितीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक काय आहे? – तिसरा
  • शिकागो येथे होणाऱ्या 2024-25 च्या जागतिक स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये (World Squash Championships) महिला गटात भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? – अनाहत सिंग
  • भारतातील कोणत्या शहरात नवीन ब्राह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन सुविधा स्थापन केली जात आहे? – लखनऊ
  • लखनऊमध्ये ब्रह्मोस युनिट स्थापन करण्यासाठी एकूण किती गुंतवणूक झाली आहे? – ₹300 कोटी
  • मध्यम-पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (MRSAM) इंडिया इकोसिस्टम समिट 2.0 कुठे आयोजित करण्यात आली होती? – नवी दिल्ली
  • दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) च्या 19 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद कोणत्या भारतीय राज्यात आहे? – अरुणाचल प्रदेश
  • DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्कॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे? – हैदराबाद
  • भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप 25 कंपनीच्या यादीत स्थान मिळवले आहे? – रिलायन्स इंडस्ट्रीज
  • कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे? – सौदी अरामको (Saudi Aramco)

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 10 May 2025

  • कोणते राज्य परमाणू परियोजना मध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? – महाराष्ट्र
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करण्यात आला आहे? – 15 ते 30 एप्रिल
  • सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो-खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे? – सुवर्ण
  • सातव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो-खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कोणते पदक जिंकले आहे? – रौप्य
  • कोणत्या देशाने 5000 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी अदानी समूहासोबत सामंजस्य करार केला? – भूतान
  • भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? – कर्नाटक
  • एअरपोर्ट शो आणि ग्लोबल एअरपोर्ट लीडर्स फोरम 2025 ची 24 वी आवृत्ती कोणत्या शहरात संपन्न झाली? – दुबई
  • भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे? – 3
  • 6 वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? – थायलंड
  • अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे? – फ्रान्स

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 9 May 2025

  • महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ ही मोहीम कोणत्या भारतीय राज्याने सुरू केली? – महाराष्ट्र
  • चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने किती निधी मंजूर केला आहे? – रु. 681 कोटी
  • ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साइटवर एअर स्टाइक केली आहे? – 9
  • मानव विकास निर्देशांक (HDI) 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? – 130वा
  • मानव विकास निर्देशांक (HDI) 2025 नुसार, कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? – आइसलँड
  • आयएनएस तमाल (INS Tamal) ही युद्धनौका कोणत्या वर्गात मोडते? – क्रिवॅक-III श्रेणी
  • भीमगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? – कर्नाटक
  • दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन साजरा केला जातो? – 8 मे
  • या वर्षीच्या जागतिक रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट दिनाची थीम काय आहे? – मानवता जिवंत ठेवणे (Keeping Humanity Alive)
  • संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – के.सी. वेणुगोपाल

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 8 May 2025

  • यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे? – वर्धा
  • पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘पर्यटन मित्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? – महाराष्ट्र
  • भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले होते? – ऑपरेशन सिंदूर
  • पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ कार्यक्रमांतर्गत पहिले मानवी अंतराळ उड्डाण केव्हा नियोजित आहे? – 2027
  • भारताचा कोणता स्टार क्रिकेटपटूने नुकतीच कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली? – रोहित शर्मा
  • भारतीय नौदलाचे कोणते जहाज मानवीय मदत आणि आपत्ती निवारण (HADR) सरावासाठी मालदीवमध्ये पोहोचले? – INS शारदा (INS Sharda)
  • कोणत्या शहरातील विमानतळाने कार्यक्षमता आणि समन्वय वाढविण्यासाठी ‘डिजिटल-प्रथम’ विमानतळ ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर सुरू केले आहे? – मुंबई (आंतरराष्ट्रीय विमानतळ)
  • नुकताच भारताचा कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार व सामाजिक सुरक्षा करार झाला आहे? – इंग्लंड
  • UK मध्य दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक FDI कोणत्या देशातून होते? – भारत
  • Cyclone 2025 संयुक्त सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे? – भारत आणि इजिप्त

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 6 May 2025

  • आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पस स्थापन करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने यूके आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केला आहे? – महाराष्ट्र
  • कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा,वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे? – महाराष्ट्र
  • दरवर्षी जागतिक दमा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – मे महिन्यातील पहिला मंगळवार
  • कोणत्या मंत्रालयाने राज्यांना नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत? – गृह मंत्रालय
  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्यांदा कोण विजयी झाले आहे? – अँथनी अल्बानीज
  • भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात आहे? – छत्तीसगड
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉलिवूड आणि अमेरिकन चित्रपट निर्मात्यांना संरक्षण देण्यासाठी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर किती कर लावण्याची घोषणा केली? – 100%
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोठे केले? – पटना, बिहार
  • 7 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? – जलतरण (Swimming)
  • अर्जेंटिना येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटील ने किती मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे? – 10

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 5 May 2025

  • अलीकडेच, कोणत्या राज्याने देशातील पहिले स्वतंत्र जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले? – महाराष्ट्र
  • इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? – महाराष्ट्र
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 साजरा करण्यात आला? – 15 ते 30 एप्रिल
  • देशभरातील 26 भू-बंदरांवर आधुनिक बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कोणत्या बँकेने भारतीय भू-बंदरे प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे? – स्टेट बँक ऑफ इंडिया
  • नुकतीच, भारतीय हवाई दलाच्या वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी
  • योग महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? – नाशिक, महाराष्ट्र
  • भारतीय सौर ऊर्जा महामंडळ कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे? – नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
  • अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? – अरविंद श्रीवास्तव
  • नुकताच ‘आक्रमण’ नावाचा लष्करी सराव कोणत्या सैन्याने आयोजित केला होता? – भारतीय हवाई दल
  • 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात येणार आहे? – मिश्र मार्शल आर्ट्स (MMA)

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 4 May 2025

  • महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – भीमराव पांचाळे
  • महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – महेश मांजरेकर
  • जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक 2025 नुसार भारत कोणत्या स्थानावर आहे? – 151 वा
  • महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – मुक्ता बर्वे
  • ऑपरेशन चक्र-V (Operation Chakra V) कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे? – सीबीआय (CBI)
  • कोणत्या देशाने भारतासोबत स्वच्छ आणि शाश्वत उर्जेच्या क्षेत्रात सहकार्य बळकट करण्यासाठी नवीन सामंजस्य करार (MoU) केला? – डेन्मार्क
  • अलीकडेच, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे सदस्य म्हणून कोणी पदभार स्वीकारला? – अनुराधा प्रसाद
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन केले? – नवी दिल्ली
  • एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? – टी. रबी शंकर
  • NITI आयोगाने ऑटोमोटिव्ह क्षेत्राच्या जागतिक स्पर्धात्मकतेवर अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार भारताचा जागतिक ऑटोमोबाईल उत्पादनात कोणता क्रमांक आहे? – चौथा

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 3 May 2025

  • महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे? मुंबई
  • लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? – कुमार मंगलम बिर्ला
  • 62 व्या राष्ट्रीय सागरी दिन आणि व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन कोणी केले? – महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
  • मे 2025 मध्ये कोणत्या बॅडमिंटन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला? – सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग सेट्टी
  • कोणत्या संस्थेने ‘व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम अॅडव्होकेसी नेटवर्क (VoTAN)’ हा उपक्रम सुरू केला आहे? – संयुक्त राष्ट्रांचे दहशतवाद विरोधी कार्यालय (UNOCT)
  • कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिली एआय-संचालित रिअल-टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम सुरू केली? – मध्यप्रदेश
  • नुकतीच, मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? – कॅनडा
  • केंद्र सरकारने नागरी विमान वाहतूक सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे? – समीर कुमार सिन्हा
  • भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे (Enhancing MSME Competitiveness in India) हा अहवाल अलीकडेच कोणी प्रसिद्ध केला? – नीती आयोग
  • नुकतीच, केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे? – अरविंद श्रीवास्तव

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 2 May 2025

  • नुकतीच, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – देवेन भारती
  • भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – न्यायमूर्ती बी.आर. गवई
  • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) लाँच केलेल्या ‘सचेत’ अॅपचा प्राथमिक उद्देश काय आहे? – लवकर आपत्ती सूचना (early alerts for natural disasters)
  • स्टारलिंकशी स्पर्धा करण्यासाठी कोणत्या कंपनीने प्रोजेक्ट कुइपर (Kuiper) अंतर्गत आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला? – अमेझॉन
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या (National Security Advisory Board) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? – आलोक जोशी
  • भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? – पाकिस्तान
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता? – 1960
  • कोणत्या संस्थेने विशेष 301 अहवाल प्रकाशित केला आहे? – युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR)
  • आयुष्मान भारत दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – 30 एप्रिल
  • राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (National Environmental Engineering Research Institute – NEERI) कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे? – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 May 2025

  • महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणत्या दिवशी साजरे केले जातात? – 1 मे
  • महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कुठे बांधण्यात आले आहे? – नागपूर
  • नवी दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन क्रीडा स्पर्धेत भारताने किती सुवर्णपदके जिंकली? – 83 सुवर्णपदके
  • नागरी प्रतिष्ठान समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? – 71
  • बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) साजरा केला जातो? – 26 एप्रिल
  • अलीकडेच कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? – मार्क कार्नी
  • भारताने 26 राफेल मरीन लढाऊ विमाने (Rafale Marine aircraft) खरेदी करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? – फ्रान्स
  • कोणत्या संस्थेने प्रवाह (PRAVAAH) पोर्टल सुरू केले? – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
  • पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र (पर्यटन सुरक्षा दल) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? – महाराष्ट्र
  • नुकताच, World Social Report 2025 कोणी जारी केला आहे? – युनायटेड नेशन

दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment