[PDF] Police Bharti GK Questions and Answers: पोलीस भरती मध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न-उत्तरे

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
Police Bharti GK Questions in Marathi
Advertisements

Police Bharti GK Questions and Answers: In this article, we have included more than 500+ repeatedly asked questions from previous Police Bharti exams. Since most questions follow similar patterns every year, practicing these will help you understand the exam pattern and significantly improve your overall score.

Police Bharti GK Questions and Answers (Most Important General Knowledge)

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम मराठी भाषा, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान अशा चार प्रमुख विभागांवर आधारित असतो. या परीक्षेमध्ये एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते आणि प्रत्येक विषयाचे वजनमान संबंधित विभागाने ठरवलेले असते. मात्र, 2021 आणि 2023 मध्ये झालेल्या मागील पोलीस भरती परीक्षेचे विश्लेषण केल्यास सामान्य ज्ञान या विषयाला 40 ते 50 गुणांपर्यंत महत्त्व दिले गेलेले दिसते. त्यामुळे पोलीस भरती (Police Bharti) साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सामान्य ज्ञान (GK) हा सर्वात Scoring आणि Selection ठरवणारा विषय मानला जातो.

Advertisements

Police Bharti 2025 General Knowledge Questions – PDF Download

याच गोष्टी लक्षात घेऊन आम्ही येथे 500+ महत्वाचे Police Bharti जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून आहेत, जे पूर्वीच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत आणि पुढील परीक्षांमध्ये पुन्हा विचारले जाण्याची शक्यता आहे. या प्रश्नांचा सराव केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल, परीक्षा कशी असते याची स्पष्ट कल्पना मिळेल आणि GK विभागात जास्त गुण मिळवण्याची संधी निर्माण होईल.


Police Bharti 2025 Preparation Tips: Most Asked Topics in Police Bharti Exam

पोलीस भरतीमध्ये पोलीस खात्याविषयी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये GK विभागात फक्त इतिहास, भूगोल किंवा चालू घडामोडी नव्हे तर पोलीस खात्याशी संबंधित विशेष प्रश्न वारंवार विचारले जातात. या विभागात तुम्हाला पोलीस पदे, शाखा, कायदे, केंद्रीय संस्था, सध्याचे अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस दलाविषयी सर्वात महत्त्वाचे आणि Repeated प्रश्नांची तयारी करता येईल. ही माहिती परीक्षेतील GK विभाग Scoring करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये फक्त सामान्य ज्ञान, गणित आणि रीझनिंग नाही, तर पोलीस खात्याशी संबंधित माहितीवर आधारित प्रश्नही मोठ्या प्रमाणात विचारले जातात. अनेक उमेदवार हा भाग दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते गुण गमावतात.

पोलीस दलातील पदरचना आणि ज्येष्ठता क्रम (Police Hierarchy & Ranks)

पोलीस भरती परीक्षेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, पदे आणि त्यांचे इन्सिग्निया (Stars, Ribbons, Lines) यावर प्रश्न विचारले जातात.

महाराष्ट्र पोलीस पदक्रम
पदओळख चिन्ह
DGP (महासंचालक)चांदीचे राष्ट्रीय चिन्ह
ADGPराष्ट्रीय चिन्ह + एक तारा
IGदोन तारे
DIGएक तारा
SP / DCPतीन स्टार
ASP / ACPदोन स्टार
PSIएक स्टार
ASIतीन पट्टे
हवालदारदोन पट्टे
पोलीस शिपाईपट्टा नाही

सध्याचे अधिकारी (Current Key Police Officers)

यामध्ये खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात:

  • महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण?
  • महाराष्ट्राचे DGP कोण?
  • मुंबई पोलीस आयुक्त कोण?
  • अर्ज केंद्राच्या जिल्ह्यातील SP किंवा CP कोण?

Note: हा विभाग Last-Minute Revision Topic असतो.

हे प्रश्न Current Affairs आधारित असतात आणि नेहमी बदलत असल्याने परीक्षा जवळ आली की अपडेट करणे महत्त्वाचे असते.

Police Bharti साठी आवश्यक चालू घडामोडी (Marathi Current Affairs) इथे वाचा. (Click Here)

महाराष्ट्र पोलीस दलाच्या विशेष शाखा (Special Units of Maharashtra Police)

पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये खालील शाखांचे कार्य, स्थापना वर्ष, ब्रीदवाक्य आणि मुख्यालयावर प्रश्न विचारले जातात.

अं. क्र.शाखाकार्यविशेष माहिती
1SRPFतातडीची कायदा व सुव्यवस्था नियंत्रणमुंबई/नाशिक/पुणे इ. ठिकाणी ग्रुप
2K-9 Unitबॉम्ब शोध, शोधमोहीमप्रशिक्षित डॉग स्क्वॉड
3C-60नक्षलविरोधी ऑपरेशनगडचिरोली/गोंदिया जिल्हा
4ATSदहशतवाद विरोधमॉड्यूल्स डिटेक्शन
5Force Oneमुंबईसाठी अत्याधुनिक कमांडो फोर्स26/11 नंतर स्थापना
6होमगार्डपूर, अपघात व आपत्ती व्यवस्थापनपूरक सहाय्यक दल
7ACBलाचलुचपत प्रतिबंधMumbai HQ

कायदे आणि त्यांचे वर्ष (Laws & Acts)

पोलीस भरती मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यास लक्ष्य येते कि थेट कलमावर नसतात, पण कायद्याच्या विषय, वर्ष आणि उद्देशावर येतात.

वारंवार विचारले जाणारे कायदे
अं. क्र.कायदावर्षक्षेत्र
1IPC (Indian Penal Code)1860फौजदारी गुन्हे
2CrPC (Criminal Procedure Code)1973गुन्हे प्रक्रिया
3Evidence Act1872पुरावे व साक्ष
4महाराष्ट्र पोलीस कायदा1951पोलिसिंग व्यवस्था
5POCSO Act2012बाल संरक्षण
6NDPS Act1985अमली पदार्थ नियंत्रण
7UAPA1967दहशतवाद विरोध

केंद्रीय तपास संस्था आणि सुरक्षा दल (Central Agencies & Forces)

या विभागावर प्रश्न साधे पण महत्त्वाचे असतात:

अं. क्र.संस्थाकार्य
1CBIमोठे आर्थिक, भ्रष्ट्राचार व गुन्हे
2EDमनी लॉन्डरिंग व आर्थिक गुन्हे
3NIAराष्ट्रीय सुरक्षा व दहशतवाद
4IBअंतर्गत गुप्तचर
5RAWबाह्य गुप्तचर
6SPGपंतप्रधान सुरक्षा
7CRPF / BSF / CISF / ITBPCAPF (अर्धसैनिक दल)

पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त अभ्यास नव्हे तर पोलीस खात्याची मूलभूत समज, पदरचना, शाखा, कायदे आणि सध्याचे अधिकारी यांची अद्ययावत माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

या पेजवर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे महत्वाचे Police Bharti General Knowledge प्रश्न आणि उत्तरे दिलेली आहेत. तसेच उमेदवार Police Bharti GK PDF देखील डाऊनलोड करू शकतात.

1) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर: देवेंद्र फडणवीस

2) महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर: देवेंद्र फडणवीस

3) महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते?

उत्तर: पोलीस महासंचालक

4) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? / पुणे शहर चालक 2023, अहमदनगर चालक 2023, चंद्रपूर पोलीस 2023, नवी मुंबई पोलीस 2023, नागपूर SRPF 2021, ठाणे चालक 2021, गोंदिया SRPF 2021) (हा प्रश्न आतापर्यंत 150 हून अधिक वेळा विचारण्यात आला आहे.)

उत्तर: रश्मी शुक्ला (डिसेंबर 2025 पर्यंत कार्यकाळ). वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते महाराष्ट्राचे पुढील डीजीपी म्हणून नियुक्त होणार असून ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत या पदावर कार्यभार सांभाळतील.

5) सध्या मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? / (अहमदनगर पोलीस 2023, पुणे लोहमार्ग 2023)
(हा प्रश्न आत्तापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: देवेन भारती (30 एप्रिल 2025 पासून).

6) महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण?

उत्तर: राजेश कुमार मीणा (1 जुलै 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली)

7) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते?

उत्तर: सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

8) पोलीस खात्यातील कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते.

उत्तर: पोलीस निरीक्षक

9) राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारित चालते?

उत्तर: गृह मंत्रालय

10) महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकॅडमी (एमआयए) कोणत्या शहरात आहे?

उत्तर: पुणे

11) पोलीस स्मृतिदिन केव्हा असतो?

उत्तर: 21 ऑक्टोबर

12) महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (Flag Day) कधी साजरा केला जातो? (10+ वेळा)

उत्तर: 2 जानेवारी

13) राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) स्थापना दिवस कोणता? (10+ वेळा)

उत्तर: 6 मार्च

14) FIR चा फुल फॉर्म काय आहे? (5+ वेळा विचारण्यात आला आहे.)

उत्तर: First Information Report.

15) SRPF गट क्र. 16 कोठे आहे? (10+ वेळा -यावर आधारित प्रश्न असतोच.)

उत्तर: कोल्हापूर

16) माहिती अधिकार कायद्यानुसार जीवितास धोका असल्यास माहिती किती वेळेत देणे बंधनकारक आहे? (5+ वेळा)

उत्तर: 48 तास

17) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? (5+ वेळा)

उत्तर: मुंबई.

18) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे?

उत्तर : दक्षता

19) नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने कोणते विशेष दल स्थापन केले आहे? (7 वेळा)

उत्तर : C-60

20) C-60 दलाचे ब्रीदवाक्य ……… आहे.

उत्तर : विरभोग्या वसुंधरा

21) महाराष्ट्र पोलीस दलातील चालू असलेली सीसीटीएनएस (CCTNS) सिस्टिम म्हणजे….?

उत्तर : क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम

22) पोलीस पाटील यांची नेमणूक कोणत्या कायद्यान्वये होते? (5+ वेळा)

उत्तर : महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967

23) पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

उत्तर : नाशिक

24) महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते?

उत्तर: पोलीस शिपाई

25) राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत?

उत्तर: 16

26) महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधीचा?

उत्तर: 1951

27) महाराष्ट्रात NSG च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते? / दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राचे विशेष दल कोणते? (5+ वेळा)

उत्तर: फोर्स वन (Force One)

28) भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी चा आहे? (हा प्रश्न आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: 1861

29) सातारा पोलिसांच्या छेडछाडविरोधी पथकाचे नाव काय?

उत्तर: निर्भया

30) देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

उत्तर: एनआयए (NIA)

31) RAW (रॉ) या भारताच्या बाह्य गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत?

उत्तर: पराग जैन

32) महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?

उत्तर: पुणे

33) एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलीसांचा कोणता विभाग कारवाई करतो?/ (सोलापूर शहर पोलीस 2021) (हा प्रश्न आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: एसीबी (Anti Corruption Bureau – ACB)

34) भारतीय दंड संहिता (IPC) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ? (सोलापूर शहर चालक 2023, दौंड SRPF 2021, आणि नागपूर कारागृह 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे.)

उत्तर: 1860

35) पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा या दिवशी प्रदान केला? /(ठाणे ग्रामीण चालक 2023, सातारा पोलीस 2021) (हा प्रश्न आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: 2 जानेवारी 1961

36) कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? (नांदेड पोलीस भरती 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता.)

उत्तर: महाराष्ट्र

37) महाराष्ट्र राज्यात सध्या किती पोलीस आयुक्तालये आहेत? (25+ वेळा)

उत्तर: 12 (मीरा-भाईंदर 12 वे आहे).

38) महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र (Range) किती आहेत? (25+ वेळा)

उत्तर: 8

39) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? / (ठाणे ग्रामीण चालक 2023, चंद्रपूर पोलीस 2023, नांदेड पोलीस 2023, जालना पोलीस 2021) (हा प्रश्न आतापर्यंत 50 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद.

40) निती आयोगाचे (NITI Aayog) पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? (25+ वेळा)

उत्तर: पंतप्रधान (नरेंद्र मोदी).

41) भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? / (गोंदिया SRPF 2023, ठाणे ग्रामीण पोलीस 2023, नांदेड पोलीस 2023, अमरावती पोलीस 2023, नागपूर ग्रामीण चालक 2021) (परीक्षेत हा प्रश्न 20 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)

उत्तर: 26 नोव्हेंबर 1949.

42) भारताचे संविधान कधी अमलात आले? (20+ वेळा)

उत्तर: 26 जानेवारी 1950.

43) सध्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? (20+ वेळा)

उत्तर: राहुल नार्वेकर.

44) महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? (15+ वेळा)

उत्तर: 48.

45) रोजगार हमी योजनेचे (EGS) प्रवर्तक कोण मानले जातात? (10+ वेळा)

उत्तर: वि. स. पागे.

46) भारतीय संविधानात एकूण किती कलमे (सुरुवातीला) होती? (5+ वेळा)

उत्तर: 395.

47) तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? (5+ वेळा)

उत्तर: जिल्हाधिकारी.

48) महाराष्ट्रातील पंचायतराजसाठी कोणती समिती नेमली होती? (5+ वेळा)

उत्तर: वसंतराव नाईक समिती.

49) आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा घेणे बंधनकारक आहे? (5+ वेळा)

उत्तर: 4 सभा.

50) जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्यात आले? (5+ वेळा)

उत्तर: कलम 370.


500+ Police Bharti GK Questions – Free PDF Download

Candidates can download the 500+ Police Bharti GK Questions PDF from the link given below and use it for practice for the upcoming Police Bharti exam.

500+ Police Bharti GK QuestionsDownload (available soon)
Advertisements

Leave a Comment