DTP Maharashtra Bharti 2025: The Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra State, has started the online application process for 154 vacancies of Junior Draftsman (Group-C) and Tracer/Draftsman (Group-C) posts. Eligible candidates can apply online through the official website dtp.maharashtra.gov.in till July 20, 2025.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकूण 154 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 19 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या संधीचा लाभ घेऊन सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
सूचना – विभागमार्फत 01/2025 आणि 02/2025 अश्या दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
संस्थेचे नाव: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
जाहिरात क्र.: 01/2025 आणि 02/2025
भरती प्रकार: पर्मनंट सरकारी नोकरी
भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन
पदाचे नाव: कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क)
पदांची संख्या: 154 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) (Junior Draftsman) | 28 |
2 | अनुरेखक (गट-क) (Tracer/Draftsman) | 126 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 154 |
शैक्षणिक पात्रता: (1) 10वी उत्तीर्ण (2) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य (3) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार वयाची सूट दिली जाणार आहे.
अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु.1000/-
- मागासवर्गीय: रु.900/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.21,700/- ते रु.69,100/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ छत्रपती संभाजीनगर / अमरावती येथे नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 19 जून 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जुलै 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | जाहिरात 1 – येथे क्लिक करा जाहिरात 2 – येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.