CISF Constable Tradesmen Bharti 2025: The CISF Tradesman Recruitment 2025 notification has been released on the official website @cisf.gov.in. Through this recruitment, the Central Industrial Security Force is going to fill 1,161 vacancies across various trades. The online application process started on 5th March and will continue until 3rd April 2025.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करून भरतीची घोषणा केली आहे. अधिसूचनेनुसार, या भरतीच्या माध्यमातून 1161 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
जाहिरात क्र.: CONSTABLE/ FIRE MALE -2024 IN CISF
भरती प्रकार: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत पर्मनंट भरती
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: विविध
पदांची संख्या: 1161 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल /कुक | 493 |
2 | कॉन्स्टेबल / कॉबलर | 09 |
3 | कॉन्स्टेबल / टेलर | 23 |
4 | कॉन्स्टेबल / बार्बर | 199 |
5 | कॉन्स्टेबल / वॉशरमन | 262 |
6 | कॉन्स्टेबल / स्वीपर | 152 |
7 | कॉन्स्टेबल / पेंटर | 02 |
8 | कॉन्स्टेबल / कारपेंटर | 09 |
9 | कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन | 04 |
10 | कॉन्स्टेबल / माळी | 04 |
11 | कॉन्स्टेबल / वेल्डर | 01 |
12 | कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक | 01 |
13 | कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट | 02 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 1161 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आयटीआय (ITI) कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. (कॉन्स्टेबल/स्वीपर – 10वी उत्तीर्ण)
वयोमर्यादा:
- 18 ते 23 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- जनरल/ओबीसी: रु.100/-
- एस सी/एस टी/ExSM : फी नाही.
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.21,700/- ते रु.69,100/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 05 मार्च 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 एप्रिल 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया (CISF Constable Tradesmen Selection Process 2025): निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी (Physical Test), लेखी परीक्षा (Written Exam), ट्रेड टेस्ट (Trade Test), दस्तऐवज पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) या पाच महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवाराने प्रथम शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर संबंधित पदानुसार ट्रेड टेस्ट घेतली जाईल, जिथे उमेदवाराच्या व्यावहारिक कौशल्यांची चाचणी केली जाते. पुढील टप्प्यात, सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होईल. प्रत्येक टप्प्यात पात्र ठरल्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी संधी मिळेल. त्यामुळे अर्ज करताना सर्व निकष आणि पात्रता अटींची काळजीपूर्वक पूर्तता करावी.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- ट्रेड चाचणी (Trade Test)
- लिखित परीक्षा (Written Examination)
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.