Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांच्या 222 जागांसाठी भरती

By Nitin Tonpe

Published on:

Follow Us
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026
Advertisements

CSMC Recruitment 2026: The Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has announced a major recruitment drive for 2026, inviting online applications for 222 vacancies across various departments. Candidates can apply through the official website at chhsambhajinagarmc.org. The last date to submit the online application is 18 March 2026. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.

CSMC Recruitment 2026 Overview

CSMC Notification 2026
Name of OrganizationChhatrapati Sambhajinagar Municipal Corporation (CSMC)
Exam NameCSMC Recruitment 2026
Post NameVarious Posts
Total Vacancy222
Application Start Date17 February 2026
Last Date to Apply18 March 2026
Mode of Application      Online
Selection Process• Online Examination (Depending on the post)
Job LocationChhatrapati Sambhajinagar
Official Websitechhsambhajinagarmc.org
(Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026

www.SpardhaPariksha.com

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 222 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती 2026 साठी जाहीर करण्यात आली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2026 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक-यंत्रचालक, उद्यान सहाय्यक/कृषि सहाय्यक, अनुरेखक (ट्रेसर), अग्निशामक आणि रोखपाल अशा विविध पदांचा समावेश आहे. महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी शोधणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Advertisements

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC)

जाहिरात क्र.: मनपा/आस्था-1/2026/187

भरती प्रकार: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पर्मनंट नोकरीची संधी.

भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन

पदाचे नाव: विविध पदे.

पदांची संख्या: 222 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
2उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
5स्वच्छता निरीक्षक12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चालक-यंत्रचालक (Driver Operator)15
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
9अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक100
11रोखपाल12
एकूण रिक्त पदांची संख्या222

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी (Civil) पदवी
2उपअग्निशमन केंद्र अधिकारीस्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर किंवा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा B.E. (Fire)
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी(I) कोणत्याही शाखेतील पदवी (II) लष्कर, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
4स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक(I) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. (II) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
5स्वच्छता निरीक्षक(I) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (II) स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
6पशुधन पर्यवेक्षक(I) 12वी उत्तीर्ण (II) पशुसंवर्धन डिप्लोमा (III) 02 वर्षे अनुभव
7चालक-यंत्रचालक (Driver Operator)(I) 10वी उत्तीर्ण (II) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (III) जड वाहन चालक परवाना (IV) 03 वर्षे अनुभव
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक(I) B.Sc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी. (II) 03 वर्षे अनुभव
9अनुलेखक (ट्रेसर)(I) 10वी उत्तीर्ण (II) ITI (Tracer/Draftsman)
10अग्निशामक(I) 10वी उत्तीर्ण (II) अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
11रोखपाल(I) B.Com (II) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: रु.1000/-
  • अनाथ/मागासवर्गीय: रु.900/-

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.25,500/- ते रु.1,22,800/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख17 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2026
परीक्षालवकरच जाहीर करण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईट (Website)येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements