RBI Assistant Recruitment 2026: The Reserve Bank of India (RBI) has released the RBI Assistant Notification 2026, announcing 650 vacancies for Assistant posts. Interested and eligible candidates can submit their application forms through the official website, rbi.org.in. The deadline for submission of RBI Assistant Online Form is 8 March. Read below for complete details on eligibility, vacancy, selection process, and how to apply.
RBI Assistant Recruitment 2025 – Overview
| RBI Assistant Notification 2026 | |
| Name of Organization | Reserve Bank of India (RBI) |
| Exam Name | RBI Assistant Recruitment 2026 |
| Post Name | Assistant |
| Total Vacancy | 650 |
| Application Start Date | 16 February 2026 |
| Last Date to Apply | 08 March 2026 |
| Mode of Application | Online |
| Selection Process | • Prelims • Mains • Language Proficiency Test |
| Job Location | All India |
| Official Website | rbi.org.in |
| (RBI Assistant Bharti 2026) भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026 www.SpardhaPariksha.com |
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ‘सहाय्यक’ (Assistant) पदांच्या एकूण 650 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जागा देशातील विविध शहरांमधील आरबीआय कार्यालयांमधील असून त्या भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि नागपूरसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 मार्च 2026 आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: भारतीय रिझर्व्ह बँकेत पर्मनंट नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: असिस्टंट
पदांची संख्या: 650 जागा
रिक्त जागांचा तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | असिस्टंट (Assistant) | 650 |
| एकूण रिक्त पदांची संख्या | 650 | |
शैक्षणिक पात्रता: I) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण श्रेणी आवश्यक). II) तसेच, उमेदवाराला संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे (Word Processing) ज्ञान असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा:
- 20 ते 28 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.450/-
- SC/ST/PWD: रु.50/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.58,580/- ते रु.74,590/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
| अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 मार्च 2026 |
| परीक्षा | पूर्व परीक्षा: 11 एप्रिल 2026 मुख्य परीक्षा: 07 जून 2026 |
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट (Website) | येथे क्लिक करा |
| जाहिरात (Notification PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
