IBPS Clerk Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 10277 जागांसाठी मेगाभरती

Advertisements

IBPS Clerk Recruitment 2025: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released the official notification for Clerk posts. The online application process began on 1 August 2025, and a total of 10,277 vacancies will be filled through this recruitment drive. Interested and eligible candidates can apply online through the official website at ibps.in. The last date to submit applications is 21 August 2025. The IBPS Clerk 2025 examination will be conducted in two phases i.e. Prelims and Main. Read below for detailed information on eligibility criteria, important dates, selection process, and how to apply.

(IBPS Clerk Bharti 2025) IBPS लिपिक भरती 2025

www.SpardhaPariksha.com

बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने आयबीपीएस लिपिक भरती 2025 (IBPS Clerk Bharti) साठी अधिसूचना जारी केली असून, याअंतर्गत क्लर्क कॅडरमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स पदांसाठी एकूण 10,277 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून 21 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

Advertisements

या भरती मार्फत सर्वाधिक रिक्त पदे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन टप्प्यांतून जावं लागणार आहे. पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि क्वांटिटेटिव्ह अॅणप्टिट्यूड या विषयांवर आधारित 150 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, जे एकूण 200 गुणांचे असतील. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब न करता त्वरित अर्ज करावा.

IBPS लिपिक भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)

जाहिरात क्र.: CRP CSA-XV

भरती प्रकार: 11 विविध क्षेत्रातील बँकांमध्ये पर्मनंट नोकरीची संधी

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: लिपिक

पदांची संख्या: 10277 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1 लिपिक 10277
एकूण रिक्त पदांची संख्या 10277

शैक्षणिक पात्रता:

1) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य 2) संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व काम करण्याचे ज्ञान आवश्यक. (संगणक प्रमाणपत्र/डिप्लोमा/ विषयासह पदवी)

वयोमर्यादा:

  • 20 ते 28 वर्षे 
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.850/-  
  • SC/ST/PWD/ExSM: रु.175/-

निवड प्रक्रिया:

  • पूर्वपरीक्षा
  • मुख्य परीक्षा

परीक्षेचा नमुना:

1) पूर्व परीक्षा:

  • विषय: सामान्य ज्ञान, इंग्रजी, तर्क आणि संख्यात्मक अभियोग्यता
  • एकूण गुण: 200
  • प्रश्नांची संख्या: 150

(प्रिलिम्समध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल.)

2) मुख्य परीक्षा:

  • विषय: तर्क क्षमता आणि संगणक अभियोग्यता, इंग्रजी भाषा, परिमाणात्मक अभियोग्यता, सामान्य, आर्थिक जागरूकता
  • एकूण गुण: 200
  • प्रश्नांची संख्या: 190

मासिक वेतन: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.24,050/- ते रु.64,480/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख01 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2025
परीक्षापूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2025
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements