SBI Clerk Bharti 2025: सरकारी नोकरीची संधी! भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180+ जागांसाठी मेगाभरती

Advertisements

SBI Clerk Recruitment 2025: State Bank of India (SBI) has released the official notification for SBI Clerk Recruitment 2025. This recruitment drive aims to fill 5180+ Clerk (Junior Associate) vacancies across various states in India. Eligible and interested candidates can apply online through the official website sbi.co.in. The last date to apply is 26 August 2025. Read below for details regarding eligibility, selection process, salary, and how to apply.

(SBI Clerk Bharti 2025) भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2025
 
www.SpardhaPariksha.com

ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अधिकृत वेबसाइटवर SBI लिपिक भरती 2025 (SBI Clerk Bharti 2025) साठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदासाठी 5180 पेक्षा अधिक पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आजपासून म्हणजेच 06 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे.

Advertisements

या पदासाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांना सुरुवातीला अंदाजे रु. 26,730/- प्रतिमाह एकूण वेतन मिळणार असून त्यामध्ये वेळोवेळी वाढ होत जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक पात्रतेची पूर्तता करत असल्याची खात्री करावी.

भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)

जाहिरात क्र.: CRPD/CR/2025-26/06

भरती प्रकार: भारतीय स्टेट बँकेत पर्मनंट नौकरीची संधी.

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: लिपिक

पदांची संख्या: 5180+ जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)5180
एकूण रिक्त पदांची संख्या5180+

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

  • 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु.750/-   
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.26,730/- ते रु.64,480/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख06 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 ऑगस्ट 2025
परीक्षापूर्व परीक्षा: सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements