SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांची भरती; 1075+ जागांसाठी भरती जाहीर

Advertisements

SSC MTS Bharti 2025: The Staff Selection Commission (SSC) has officially released the detailed notification for the Multi-Tasking (Non-Technical) Staff (MTS) and Havaldar (CBIC & CBN) Examination 2025. This recruitment drive aims to fill over 1075 vacancies, including 1075 Havaldar posts in CBIC and CBN. The exact number of SSC MTS vacancies 2025 is yet to be announced (TBA). The last date to apply online is July 24, 2025.

मित्रांनो, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन 24 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

Advertisements

या भरती प्रक्रियेत एकूण 1075+ पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी हवालदार पदासाठी 1075 जागा उपलब्ध आहेत (CBIC आणि CBN विभागांतर्गत). MTS पदांच्या जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

SSC MTS भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

जाहिरात क्र.: E/15/2025-C-2

भरती प्रकार: सरकारच्या विविध विभागांमध्ये पर्मनंट नोकरी

भरती श्रेणी: केंद्र सरकार

पदाचे नाव: मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार

पदांची संख्या: 1075+ जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) –
 2हवालदार 1075
एकूण रिक्त पदांची संख्या1075+

शैक्षणिक पात्रता: दोन्ही पदांसाठी 10वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • मल्टी टास्किंग स्टाफ: 18 ते 25 वर्षे
  • हवालदार: 18 ते 27 वर्षे

अर्ज फी:

  • General/OBC: रु.100/-  
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.18,000/- ते रु.56,900/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख26 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जुलै 2025
परीक्षा20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements