IBPS PO Bharti 2025: IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती

Advertisements

IBPS PO Bharti 2025: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has invited online applications for the recruitment of Probationary Officers (PO) and Management Trainees (MT) under IBPS PO Recruitment 2025. The IBPS PO application process begins on July 1, 2025, and the last date to apply online and pay the application fee is July 22, 2025. Interested and eligible candidates can submit their applications through the official website at ibps.in. A total of 5208 vacancies will be filled through this recruitment drive. The IBPS PO Preliminary Exam 2025 is scheduled to be conducted in August 2025.

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) कडून 11 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) पदांसाठी सुमारे 5208 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे. बँक PO बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊन अर्ज सादर करावा.

Advertisements

सहभागी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या निवडीसाठी पूर्व आणि मुख्य ऑनलाइन परीक्षा अनुक्रमे ऑगस्ट किंवा ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे आहे. त्यानंतर IBPS निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावेल.

IBPS मार्फत PO/MT भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.

संस्थेचे नाव: Institute of Banking Personnel Selection (IBPS)

जाहिरात क्र.: CRP PO/MT-XV

भरती प्रकार: बँकेत पर्मनंट भरती

भरती श्रेणी: केंद्र शासन

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

पदांची संख्या: 5208 जागा

रिक्त जागांचा तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)5208
एकूण रिक्त पदांची संख्या5208

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

  • 20 ते 30 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC: रु.850/- 
  • SC/ST/PWD: रु.175/-

मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा रु.48,480- ते रु.85,920/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख1 जुलै 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जुलै 2025
परीक्षापूर्व परीक्षा: ऑगस्ट 2025
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Advertisements