Maharashtra Van Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र वनरक्षक मेगा भरती 2025 – 12,991 जागा

Maharashtra Vanrakshak Bharti 2025: Maharashtra Forest Department has released a short notification for Forest Guard (Vanrakshak) Recruitment 2025 on its official website, www.mahaforest.gov.in. A total of 12,991 vacancies have been announced under the Maharashtra Vanrakshak Bharti 2025. Interested candidates can apply online once the application link becomes active.

The department is expected to announce over 12,991 vacancies for Forest Guard (Vanrakshak) posts. Candidates with a 10th pass or 12th pass qualification will be eligible to apply, depending on the specific post requirements. The detailed official notification for Maharashtra Forest Recruitment 2025 will be released soon. The online application process will begin shortly on the Forest Department’s official website.

Stay updated on eligibility criteria, syllabus, exam dates, educational qualifications, age limit, salary details, and other important information to kickstart your preparation. Keep visiting this page for the latest updates on Maharashtra Van Vibhag Bharti 2025.

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Overview

Name of OrganizationMaharashtra Forest Department
Recruitment NameVanrakshak (Forest Guard) Recruitment 2025
Post Name• Forest Guard (वनरक्षक)
Total Vacancy12,991
Starting Date For Applicationto be announced
Last Date to Applyto be announced
SalaryRs. 21,700/- to Rs. 69,100/-
Mode of ApplicationOnline
Selection process• Computer Based Test
• Physical Efficiency Test
• Document Verification
Job LocationMaharashtra
Official websitemahaforest.gov.in

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2025

The Maharashtra Forest Department is expected to announce over 12,000 vacancies for various posts, including Forest Guard, Forest Sevak, Peon, Helper, Watchman, Cleaner, and Printer Operator. Candidates with a 10th or 12th pass qualification will be eligible to apply based on the specific post requirements. Only residents of Maharashtra can apply. The official notification is yet to be released, and the online application process will begin soon on the Forest Department’s official website.

Van Vibhag Bharti: महाराष्ट्र वन विभाग भरती 2025

वन विभागामार्फत वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण 12,991 पदांची भरती होणार असून नागपूर विभागात सर्वाधिक 1,852 जागा आहेत. त्यानंतर ठाणे विभागात 1,568, छत्रपती संभाजीनगर विभागात 1,535 आणि नाशिक विभागात 888 पदे भरण्यात येणार आहेत. भरतीचे अधिकृत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी असणार आहे.

सध्याच्या वर्षात विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामध्ये वन विभाग आणि पोलीस भरती महत्त्वाच्या ठरणार आहेत. वन विभागात 12,991 पदे निश्चित करण्यात आली असून, यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण आहे. काही पदांसाठी 10वी उत्तीर्णताही ग्राह्य धरली जाणार आहे. अर्ज करताना उमेदवाराचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, बोर्डाचे गुणपत्रक आणि शैक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक असतील.

वनरक्षक पदांसह इतर पदांची भरती देखील या प्रक्रियेत होण्याची शक्यता आहे. यात वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार यांचा समावेश होऊ शकतो. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. जाहिरात लवकरच उपलब्ध होईल. उमेदवारांनी वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत राहावी. शारीरिक चाचणी अंतर्गत पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी आणि महिला उमेदवारांसाठी 3 किमी धावण्याची अट असते. त्यामुळे इच्छुकांनी नियमित सराव करून तयारीत कोणतीही कमतरता ठेवू नये.

Maharashtra Vanrakshak Bharti 2025 Syllabus – येथे क्लिक करून संपूर्ण वनरक्षक भरती अभ्यासक्रम पाहू शकता.

Van Vibhag Bharti 2025 Posts: पदाचे नाव

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 1वनरक्षक (Forest Guard)12,991
एकूण रिक्त पदांची संख्या12,991

Van Vibhag Bharti 2025 Vacancy: रिक्त जागा तपशील

महाराष्ट्रात वन विभागात वनरक्षक (Maharashtra Vanrakshak Vacancy) तसेच इतर पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 12,991 पदे भरली जाणार असून, विभागानुसार रिक्त पदांची माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

विभागपद संख्या
नाशिक887
छत्रपती संभाजीनगर1535
नागपूर1852
चंद्रपूर845
गडचिरोली1423
अमरावती1188
यवतमाळ665
पुणे811
कोल्हापूर1286
धुळे931
ठाणे1568
इतर
एकूण रिक्त पदांची संख्या12,991

Van Vibhag Bharti 2025 Educational Qualification: शैक्षणिक पात्रता

वनरक्षक (Forest Guard) या पदासाठी उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12वी) ही विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

खालील प्रवर्गातील उमेदवार 10वी उत्तीर्ण असले तरी अर्ज करण्यास पात्र राहतील:

  • अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवार
  • माजी सैनिक (Ex-Servicemen)
  • नक्षल हल्ल्यात मरण पावलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्यांचे पाल्य

Van Vibhag Bharti 2025 Age Limit: वयोमर्यादा

वनरक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे निर्धारित करण्यात आली आहे:

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी: 18 ते 27 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 ते 32 वर्षे

Van Vibhag Bharti 2025 Application Fees: अर्ज फी

वन विभाग भरती 2025 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • खुला प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागासवर्गीय: रु. 900/-

Van Vibhag Bharti 2025 Important Dates: महत्त्वाच्या तारखा

Important Dates
Short Notification Release Date11 April 2025
Start Date to Apply Onlineto be announced
Last Date to Apply Onlineto be announced
Admit Card07 days before the Exam
CBT Exam Dateto be announced
Result Dateto be announced

Van Vibhag Bharti 2025 लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या Apply Link वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा. (अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज लिंक सक्रिय केली जाईल.)

Apply Online (Link Inactive)

Van Vibhag Bharti 2025 Online Application form: कसा करावा अर्ज

वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in वर जा.
  2. होमपेजवर ‘भरती प्रक्रिया’ या टॅबवर क्लिक करा.
  3. नंतर नवीन पेज ओपन होईल, जिथे ‘ऑनलाईन अर्ज करा’ किंवा ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
  4. ‘To Register’ समोरील ‘Click Here’ वर क्लिक करा.
  5. ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडेल. त्यामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूक आणि योग्यरित्या भरा.
  6. अर्ज शुल्क भरल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.

Leave a Comment