RRB ALP Bharti 2025: The Railway Recruitment Boards (RRB) have started the online application process for the recruitment of 9,970 Assistant Loco Pilot (ALP) posts. Eligible candidates can fill out the online application form through the official website rrbapply.gov.in till May 11, 2025.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर आपले स्वागत आहे! रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने 2025 साठी असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 9,970 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ALP पद हे भारतीय रेल्वेतील एक तांत्रिक आणि जबाबदारीचे पद असून, उमेदवारांना लोकोमोटिव्ह ऑपरेशनसह विविध यांत्रिक कामकाजाची जबाबदारी पार पाडावी लागते. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे.
रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
संस्थेचे नाव: भारतीय रेल्वे (Indian Railways)
जाहिरात क्र.: 01/2025 (ALP)
भरती प्रकार: भारतीय रेल्वेत पर्मनंट सरकारी नौकरीची संधी.
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
पदांची संख्या: 9970 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 9970 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 9970 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (उमेदवाराकडे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे, तसेच NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर व्हेईकल मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक यांसारख्या ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र असावे. याशिवाय, इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा डिग्री असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.)
वयोमर्यादा: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 पर्यंत 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: रु.250/-
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल 2 अंतर्गत दरमहा रु.19,900/- वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल 2 अंतर्गत 19,900 रुपये मूळ वेतन मिळेल. यासोबतच महागाई भत्ता, गृह भाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सुविधा मिळतील. वेतन पोस्टिंगच्या ठिकाणानुसार बदलू शकते. याशिवाय, रेल्वे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा आणि रेल्वे पास यांसारख्या सुविधा मिळतात.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 12 एप्रिल 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 मे 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया:
लोको पायलट भरतीसाठी उमेदवारांची निवड सीबीटी 1 आणि 2 परीक्षा, मेडिकल आणि सायकॉलॉजी टेस्टद्वारे केली जाते. या सर्व परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्यांना रेल्वे चालवण्याची संधी मिळते. लोकापायलटला सुरुवातीला कमी पगार मिळतो, मात्र काही वर्षांच्या अनुभवांनंतर पगारात वाढ होत जाते.
RRB ALP भरती प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होईल, ज्यामुळे उमेदवारांची योग्यता आणि क्षमता तपासली जाईल:
पहिला टप्पा: संगणक आधारित चाचणी (CBT 1)
ही चाचणी पात्रता स्वरूपाची आहे, ज्यामध्ये 75 प्रश्न असतील आणि 60 मिनिटांचा वेळ मिळेल. यात गणित, तर्कशक्ती (Reasoning), सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान/चालू घडामोडींशी (Current Affairs) यांचा समावेश आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचा नकारात्मक गुणांकन आहे.
दुसरा टप्पा: संगणक आधारित चाचणी (CBT 2)
ही चाचणी दोन भागांत आहे. भाग ए मध्ये गणित, तर्कशक्ती, सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान/चालू घडामोडी यावर 100 प्रश्न (90 मिनिटे) असतील. भाग बी मध्ये ट्रेडशी संबंधित 75 प्रश्न (60 मिनिटे) असतील, जे पात्रता स्वरूपाचे आहे आणि किमान 35% गुण आवश्यक आहेत.
तिसरा टप्पा: संगणक आधारित योग्यता चाचणी (CBAT)
या चाचणीत उमेदवारांची मानसिक आणि तांत्रिक योग्यता तपासली जाते. यात किमान 42 गुण मिळवणे आवश्यक आहे, आणि यात नकारात्मक गुणांकन नाही.
चौथा टप्पा: कागदपत्र पडताळणी (Document Verification)
यात उमेदवारांची शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे तपासली जातील.
पाचवा टप्पा: वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
निवड झालेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्ती तपासली जाईल, विशेषतः दृष्टी आणि रंग ओळखण्याची क्षमता.