ITBP Sports Quota Bharti 2025: The Indo-Tibetan Border Police Force (ITBP) has started the online application for the recruitment of 133 Constable (General Duty) posts under Sports Quota in Group ‘C’ (Non-Gazetted, Non-Ministerial). Eligible candidates can fill out the online application form through the official website recruitment.itbpolice.nic.in till April 2, 2025.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने स्पोर्ट्स कोट्यातून ग्रुप ‘C’ (नॉन-गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रियल) अंतर्गत 133 कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन 2 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती खेळाडूंना विशेष संधी देणारी आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2025 (Sports Quota) साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
महत्वाचे: आमच्या वाचकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक भरतीची अधिकृत अधिसूचना आणि पात्रता निकषांची संपूर्ण तपासणी करूनच ती माहिती आमच्या वेबसाइट/ॲपवर प्रकाशित करतो आणि यापुढेही प्रामाणिकपणे करत राहू. तरीसुद्धा, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही नुकसानीसाठी SpardhaPariksha.com जबाबदार राहणार नाही.
संस्थेचे नाव: गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही ITBP भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: पर्मनंट सरकारी नोकरी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD
पदांची संख्या: 133 जागा
रिक्त जागांचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 133 |
एकूण रिक्त पदांची संख्या | 133 |
शैक्षणिक पात्रता: 1) मान्यताप्राप्त बोर्डमधून किमान 10वी (मॅट्रिक) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 2) तसेच संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे (कृपया जाहिरात पाहा).
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार वयाची सूट दिली जाणार आहे.
अर्ज फी:
- जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु.100/-
- एससी/ एसटी/ महिला: फी नाही
मासिक वेतन: नियमानुसार, या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमांनुसार इतर भत्ते आणि लाभांसह दरमहा रु.21,700/- ते रु.69,100/- वेतन दिले जाईल.
नोकरी ठिकाण: या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभर कुठेही नियुक्ती (पोस्टिंग) मिळू शकते.
अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 04 मार्च 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 एप्रिल 2025 |
परीक्षा | लवकरच जाहीर करण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |