शंकासमाधान

: नेहमीच्याच शंका :

प्रश्न १ : स्पर्धा परीक्षांचे महत्व काय?
उत्तर : या परीक्षा विद्यार्थ्याची मानसिक क्षमता, ग्राहनाक्षमाता, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवितात. (अर्थात तसा विचारपूर्वक अभ्यास केला तर आणि तरच.) कसे ते पाहू ……..
१) या परीक्षांत कच्चे कामा करायला दिली जाणारी जागा अत्यंत अपुरी असते. त्यामुळे आपसूकच मनातल्या मनांत उदाहरणे सोडविण्याची सवय लागते.
२) त्याचप्रमाणे आपणास आत्तापर्यंत आपणा जे काही शिकलो ते आठवणीत ठेवावेच लागते. एवढेच नव्हे तर प्रश्न सोडविताना एकापेक्षा जास्त गोष्टी विचारात घेउन त्यांची योग्य ती सांगड घालून उत्तरापर्यंत पोहोचावे लागते.
उदाहरणार्थ : मेधाने जून महिन्यात सम तारखांना १ लिटर तर विषम तारखांना अर्धा लिटर दुध घेतले. तर तिने या महिन्यात एकूण किती दुध घेतले? आणि १० रुपये प्रती लिटर या भावाने दुधाचे बिल किती झाले?
स्पष्टिकरण : आता हे उदाहरण सोडवित असताना फक्त दिनादर्शिकाच आठवावी लागते असे नाही तर १ ते ३० या संख्यांमध्ये किती सम व किती विषम संख्या असतात आणि सर्वात शेवटी तोंडी गुणाकार करावा लागतो.
३) स्मरणशक्ती बद्दल : अगदी साधे उदाहरण घेऊ. ४५०० – १२५६ = ? किंवा १२५६ + —— = ४५०० आता अशी उदाहरणे भाजीच्या हिशोबाप्रमाणे करावी लागतात. म्हणजे …….
अ) १२५६ चे प्रथम १२६० करण्यासाठी त्यात ४ मिळवावे लागतील.
आ) १२६० चे २००० करण्यासाठी त्यात ४० मिळवावे लागतील.
इ) आता २००० चे ४५०० करण्यासाठी त्यात २५०० मिळवावे लागतील. आणि या सर्व संख्या म्हणजे ४ + ४० + २५०० लक्षात ठेऊन सरते शेवटी त्यांची बेरीज करून उत्तर काढावे लागते. म्हणजे स्मरणशक्ती वाढतेच.

प्रश्न २ : एकूण किती प्रकारच्या परीक्षा असतात?
उत्तर : इयत्ता दुसरी ते नववी पर्यंत दरवर्षी ४१ स्पर्धा परीक्षा असतात.

प्रश्न ३ : मग यातल्या कोणत्या परीक्षा महत्वाच्या किवा चांगल्या असतात?
उत्तर : इयत्ता चौथी आणि सातवीत घेतल्या जाणा-या महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा सोडल्या तर सर्व परीक्षा खाजगी आहेत. पण परीक्षा घेणे हा देखील आजकाल एक बरकतीचा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे सर्वच परीक्षा उत्कृष्ठ आहेत. त्यामुळे ज्या परीक्षांची माहिती आपणास आपल्या शाळेतून किंवा मित्रांकडून समजेल त्या परीक्षेला बसावावे. प्रत्येक परीक्षा ही पुढच्या परीक्षेची पूर्वतयारी असे समजून अभ्यास केला तर त्याचा नक्कीच फायदा होतो.

प्रश्न ४ : शाळेत किंवा काही खाजगी कलासेसमध्येही असे सामितले जाते की ८०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणारेच विद्यार्थी या परेक्षेसाठी पात्र असतात?
उत्तर : तर असा कोणत्याही परीक्षेचा नियम नाही. अगदी सी.ई. टी. किंवा तत्सम परीक्षांना सुद्धा ही अट नसते. मग हे लोक असे का सांगतात? तर त्यांना अशा हुशार विद्यार्थ्यावर कोणतीच मेहनत करावी लागत नाही आणि फुकटचे क्रेडीट मात्र मिळून जाते. पण एकाही पालक त्यांना असे विचारात नाही की …….
अ) बाबांनो तुंम्ही जर एवढ्या हुशार विद्यार्थ्यांना शिकवता तर मग तुमचे सर्व विद्यार्थी मेरीटमध्ये का येत नाहीत?
आ) ८०% च्या पुढचे विद्यार्थी नापास का होतात?

म्हणजे निकाल चांगला लागला तर ते आमचे यश. मग ८०% पेक्षा जास्त गुण मिळविलेला तुमच्या तथाकथीत निकषांवर उतरल्यामुळे तुंम्ही हुशार म्हणून निवड केलेला विद्यार्थी नापास झाल्यास किंवा त्याला कमी गुण मिळाल्यास त्याच्या अपयशाचे धनी कोण? असा प्रश्न या अशा “यशश्वी” शिक्षकांनाच का नाही विचारत तुंम्ही?

प्रश्न ५ : परीक्षेच्या तयारीसाठी किती अभ्यास करावा लागतो?
उत्तर : दररोज अर्धा तास अभ्यास खूप झाला. आपली सरावसत्रे अशा पद्धतीने बनवलेली आहेत की विद्यार्थ्यांचा एकदाच केलेला अभ्यास कायमस्वरुपी लक्षात राहील. अभ्यास हा किती वेळा केला यापेक्षा तो कसा केला याला अधिक महत्व देणे गरजेचे असते.

प्रश्न ६ : या परीक्षांना CBSE आणि ICSE च्या बोर्डाचे विद्यार्थीच चांगले गुण मिळवू शकतात असे म्हणतात, हे खरे आहे का?
उत्तर : अजिबात नाही. तसे असते तर शाळाही फक्त त्याच चालल्या असत्या आणि जगात सर्वत्र फक्त त्याच शाळांचे विद्यार्थी दिसले असते. स्वत:चा मोठेपणा मिरविण्यासाठी किंवा स्वत:चे अपयश झाकण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवलेला हा एक समज आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे CBSE किंवा ICSE असा अभ्यासक्रम कधीच नसतो तर तो NCERT ने बनविलेला अभ्यासक्रम आहे.आणि तो आजही काही एस. एस्सी शाळा वापरतात. त्यामुळे हे असले गैरसमज डोक्यातून काढून टाका आणि अशा तथाकथीत शिक्षण तज्ञांपासून सावध रहा.