आमच्याबद्दल

about_marathi1about_marathi2
 

नितीन बगाडे, यांचे,
विद्यानिकेतन क्लासेस

नांव श्री. नितीन विठ्ठल बगाडे.
पत्ता “कैवल्य” ४० / २, गणंजय सोसायटी, कोथरुड, पुणे – ३८,
पीन : ४११०३८.
महाराष्ट्र राज्य (भारत)
भ्रमणध्वनी ९८२२०९५३९४
संकेतस्थळ www.spardhapariksha.com
ई-मेल nitinbagade@spardhapariksha.com
शैक्षणिक पात्रता B.Sc. M.A. B.Ed.
अनुभव ३३ वर्षे

मी नितीन बगाडे, १९७९ पासून म्हणजे माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्पर्धापरीक्षांचे (शालेय पातळीवरील) क्लासेस चालवित आहे. १९९४ पासून संकेतस्थळ करावे असे वाटत होते परंतू ते कसे करावे हे मी ज्यांना=ज्यांना सागत होतो त्या कोणाही डिझायनर्सना ती संकल्पना कळतच नव्हती. आणि ज्यांना समजत होती त्यांना देण्याएवढी आर्थिक सुबत्ता मजजवळ नव्हती. असो पण शेवटी या संकेतस्थळाला मूर्त स्वरुप तरी आले.

मी स्वत: चौथी व सातवीत असताना स्कॉलरशिप मिळवलेला विद्यार्थी असून माझी मेडिकलची अ‍ॅडमिशन सोडून देऊन ठरवून शिक्षक झालेला माणूस आहे. याचे सर्व श्रेय मी माझा वडिलांना देतो. कारण इयत्ता आठवीत असताना जेंव्हा शिक्षक दिना दिवशी मला शाळेत त्या दिवसाचा उत्तम शिक्षक हणून पुरस्कार मिळाल तेंव्हा मी आता शिक्षकच होणार असे माझ्या डॉक्टर असणा-या वडिलांना कळविले तेंव्हा त्यांनी मला जे पत्र लिहिले त्या पत्रात ते लिहितात, “मला तुझा निर्णय खूप आवडला, इतका की परमेश्वर करो आणी तुझी ही इच्छा कधीही न मरो. कारण अरे सर्वांना आपल्या मुलांसाठी चांगले शिक्षक हवे असतात, पण कोणालाही आपला पाल्य शिक्षक व्हावा असे वाटत नाही, अशा काळात तुला शिक्षक व्हावे असे वाटले याचा मला अभिमान आहे.”

असे हे माझे वडिल. माझ्या घरात असणा-या सर्व डॉक्टर नातेवाईकांना स्वत:च्या अंगावर झेलत त्यांनी माझा मार्ग प्रशस्त केला.